अजिंठा वनपरिक्षेत्राकडे बंदोबस्त करण्याची प्रा.जीवन कोलते यांची मावळदबारा
गोकुळसिंग राजपूत सोयगांव तालुक्यातील सावळदबारा गाव व परिसरात मोठ्या प्रमाणात माकडांनी हैदोस घातला असून मोठ्या प्रमाणात पिकांचे व गावात घराचे नुकसान करत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सावळदबारा ग्रामपंचायत कार्यालयाने सरपंच स्वातीताई भाऊराव कोलते व उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान यांच्या उपस्थितीत ठराव घेऊन सावळदबारा गावात धिंगाणा घालणाऱ्या माकडांना पकडून जंगलात सोडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता प्रा.जीवन कोलते यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे अजिंठा यांच्या कडे केली आहे.
सावळदबारा गावात बसस्थानक परिसर, चक्रधर स्वामी मंदिर परिसरात राखीव जंगलात राहणाऱ्या माकडांच्या टोळ्यांनी मागील काही दोन ते तीन वर्षापासून सावळदबारा गावात त्या माकडांच्या टोळ्यांनी आगमन केले आहे. ह्या माकडांच्या टोळ्या गाव परिसरात धुमाकूळ घालत असल्याने येथील नागरिक, महिला, लहान मुले व शेतकरी वैतागून गेले आहे.चालू वाहनावर उडी मारणे,अंगावर धाऊन येणे,हातातून किंवा टिनपत्रे यावरती ठेवलेल्या वस्तू घेऊन जात आहे. लहान मुलांना तर शाळेत जाणे कठीण झाले आहे. जंगलातून सावळदबारा गावात आलेल्या माकड टोळीतील माकडे गावातील लहान मुले व स्त्रियांच्या अंगावर धावून जात त्यांच्या हातातील वस्तू घेऊन पळून जातात. नागरिकांच्या घराबाहेर उभ्या केलेल्या वाहनावर सुद्धा उड्या मारुन नुकसान करीत आहे तसेच या माकडांच्या टोळ्या सावळदबारा शिवारातील शेतामध्ये सुध्दा धुमाकूळ घालून शेतातील कापूस, मका, भूईमूग, चवळी,मूग आदी पिंकाचेही मोठ्या प्रमाणात करत आहे.वनपरिक्षेत्राचे अधिकारी निलेश सोनवणे यांनी पिंजरा आणून त्यांना अभयारण्यात सोडण्यात या व कायम बंदोबस्त या माकडांचा करावा अशी मागणी प्रा.जीवन कोलते यांनी केली आहे.