भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीवर महाराष्ट्र प्रदेशध्याक्ष पदी चव्हाण जिल्हाध्यक्षपदी दादासाहेब काळे यांची निवड

Khozmaster
2 Min Read

राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी व स्वातंत्र्य सैनिकाचा सत्कार संपन्न    सोयगाव         ( प्रतिनिधी ) दि १७ मराठवाड्याच्या लातूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन च्या वतीने १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम सोहळा आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप खंडापूरकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली अरुणभाऊ चव्हाण यांची प्रभारी पदावरून महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदावर निवड केली . तर रिक्त पदी दादासाहेब काळे यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली . यावेळी औरंगाबाद जिल्हयातील विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली . याप्रसंगी सोयगाव तालुका अध्यक्ष पदी गोकुळ सिंग राजपुत यांची सर्वानीमते निवड करण्यात आली. संमेलन सोहळ्याच्या व मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी महान स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले .यावेळी सोयगाव,सिल्लोड व औरंगाबाद भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.दिनांक १८ सप्टेंबर रोजी आभ्यास शिबीर संपन्न झाले आसुन गेल्या वर्षभरात ज्यांनी संघटनेच्या बॅनर खाली कार्यक्रम घेतले आहेत आश्यांचा सन्मान करण्यात आला आसुन,महाराष्ट्र राज्याचे प्रदेशअध्यक्ष अरुणभाऊ चव्हाण अजिंठा, जिल्हा अध्यक्ष दादासाहेब काळे, जिल्हा शेख फेरोज भाई , जिल्हा सचिव सुनिल वैद्य , माहिला आघाडी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष श्रीमती अंजनाताई राजपुत व सिल्लोड तालुका महिला आघाडी ता प्रमुख श्रीमती राधाबाई झलवार व सोयगाव तालुका अध्यक्षपदी गोकुळसिंग राजपूत या पदाधिकार्यांची निवड जाहीर करण्यात आले . यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले . अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरुणभाऊ चव्हाण,जिल्हा अध्यक्ष दादासाहेब काळे,जिल्हा सचिव सुनील वैद्य,जिल्हा उपध्याक्ष शेख फिरोज, अंजनाताई राजपूत महिला आघाडीचे औरंगाबाद अध्यक्ष, सिल्लोड ता उपाध्यक्ष राधाताई झेलवार या मान्यवरांचा सत्कार राष्ट्रीय अध्यक्ष खंडापूरकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली ॲड.राणीताई स्वामी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा यांच्या हस्ते याचां शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मा.आ.संजय बनसोडे माजी राज्यमंत्री व संपूर्ण महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर, जळगाव, हिंगोली अशे सर्व छत्तीश जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *