चिखली तालुक्यातील शेलसुर, धोडप, पळसखेड सपकाळ, डोंगरशेवली, करवंड या परिसराला लागून ज्ञानगंगा अभयारण्य असल्यामुळे परिसरामध्ये अस्वलांचा तसेच जंगली जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात असून ,अशा घटना या परिसरामध्ये नेहमीच घडत असतात. या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते .चिखली तालुक्यातील शेलसुर येथील श्री नारायण विश्वनाथ भोरडे वय 52 शेतकरी कामानिमित्त शेतात जात असताना. दीनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11:00 वाजेच्या सुमारास शेतात जात असताना रस्त्यातच डबा धरून बसलेल्या एका अस्वलाने हल्ला केला व हल्ल्यामध्ये नारायण भोरडे हे गंभीर जखमी झाले व त्यांना शेलसुर येथील योगिराज क्लिनिक डॉ. पंकज काळे यांनी प्राथमिक उपचार करून बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालय पाठवण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चिखली तालुक्यातील शेलसुर, धोडप, डोंगरशेवली, सवणा, चांदई, पळसखेड सपकाळ करवंड, टाकरखेड या भागात याआधी सुद्धा आस्वालांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत त्यामुळे वन विभागाने आस्वालांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.