विनोद वसु अकोट ता प्रतिनिधी:: ठोक बर्डी येथे स्मशानभूमी शेड नसल्याने गावाच्या बाहेरच उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. पावसाच्या दिवसांत अंत्यसंस्कार करताना पाऊस केव्हा उघाड देईल अशी प्रतीक्षा करावी लागते.पाऊस थांबल्यावर अंत्ययात्रा निघते. अशी अवस्था या गावात असल्याचे नागरिक सांगतात. गावाची लोकसंख्या कमी असली तरी येथे सोयीसुविधा पुरविणे आवश्यक आहे. त्यातच स्मशानभूमी शेडची गरज पाहता शासनाने येथे उपाययोजना करावी. या गावात स्मशानभूमी शेड उमारण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आमच्या गावात स्मशानभूमी नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कार करण्यासाठी विचार पडतो.- संदीप दिलीप तरोडे , नागरिक, ठोक बर्डी• गावात स्मशानभूमी नसल्याने विविध समस्यांचा सामना करावा लागतो. उघड्यावर अंतिम संस्कार पार पाडले जातात.
– सुभाष वामनराव खोडके, ग्रामस्थ, ठोक बर्डी