चिखली प्रतिनिधि समाजाने, कुटुंबाने आणि व्यवस्थेने नाकारलेल्या मनोरूग्णांसाठी हक्काचं घर उभं करून माणुसकीला जपण्यासोबतच थोडं जगावेगळं जगण्याचे काम करणाऱ्या डॉ नंदू व सौ आरती पालवे यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठान’ ला बालाजी ग्रुप व अडत व्यापारी संघटनेच्या वतीने 1 लाख 51 हजार रुपयांचे किराणा समान भेट देण्यात आले. समाजातील अनेक निराधार, बेवारस आणि मनोरूग्ण असलेल्या व्यक्ती शहरातील विविध भागात दिसतात, भान हरपलेले, स्वकीयांनी झिडकारलेले, दुर्गंधीयुक्त, ओंगळवाणे, ना जगाची पर्वा ना स्वत:च्या पोटापाण्याची, ना शरीरावरील जखमांची. असे मनोरूग्ण किंवा शरीराने जर्जर होऊन रस्त्यावर बेवारस असलेल्या गोरगरीब व्यक्ती. यांच्याकडे कुणी पाहतही नाही आणि साहाय्यही करीत नाही. अशा व्यवस्थेने नाकारलेल्या मनोरूग्णांसाठी ‘सेवा संकल्प प्रतिष्ठान’ हे हक्काचं घर असून या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा या हेतूने चिखली येथील बालाजी ग्रुप व अडत व्यापारी संघटनेच्या वतीने सेवा संकल्प ला 1 लाख 51 हजार रुपयांचे किराणा समान देण्यात आले. यामध्ये मूग डाळ 2.50 किलो , वटाना 50 किलो , गहू 10 किंटल , चना डाळ 70 किलो, चावल 5 किंटल, मटकी 10 किलो फुटाना 30 किलो, तूरदाल ३० कट्टे, खोबरे ५ किलो, खड़ा मसाला ५किलो, मिर्ची ५ किलो, मिठ २ कट्टे, जीरा २किलो तेल डब्बा १५ इतर साहित्य सह किराणा सामानाचा समावेश आहे
Users Today : 14