सध्या इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक व्यापार आणि सामरिक धोरणांवर मोठा फटका बसत आहे. या युद्धाचा थेट परिणाम भारताच्या चाबहार बंदरावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चाबहार बंदर भारतासाठी सामरिक आणि आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या बंदरामुळे पाकिस्तान बायपास करून अफगाणिस्तान आणि मध्य आशियात थेट व्यापार करता येतो. 2003 पासून भारताने या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित केले आणि 2024 च्या अर्थसंकल्पात मोठा निधीही दिला.
अमेरिकेने या युद्धात धक्कादायक पावले उचलली आहेत, ज्यामुळे चाबहार बंदरावर थेट परिणाम होऊ शकतो. युद्धामुळे होर्मुज खाडी काही काळासाठी इराणकडून बंद करण्यात आली, त्यामुळे जागतिक व्यापारात तणाव निर्माण झाला. अमेरिकेने अनेक प्रयत्न करूनही इराणला मागे हटवता आले नाही; उलट इराण अधिक आक्रमक झाले आहे.
यामुळे अमेरिकेची स्थिती दोन्ही बाजूने आडचणीत आली आहे:
-
मागे हटणे शक्य नाही
-
पुढे जाऊन बंदरावर नियंत्रण मिळवणेही अवघड झाले
चाबहार बंदरावर जर युद्धाचा थेट फटका बसला, तर भारताचे मध्यम आणि लांब पल्ल्याचे व्यापार प्रकल्प प्रभावित होऊ शकतात. विशेषतः इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोर मधील क्षेत्रीय कनेक्टिविटीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या परिस्थितीत भारताला सुरक्षा, लॉजिस्टिक आणि पर्यायी मार्ग यावर लक्ष केंद्रित करून धोरणात्मक निर्णय घेणे अत्यावश्यक आहे.
Users Today : 56