विनोद वसु अकोट ता प्रतिनिधी:: टाकळी बु परिसरात पावसाने उघडीप दिल्यामुळे शेती मशागतीची सर्व कामे आटोपली होती परंतु, गत काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सर्व्हे करण्याची मागणी शेतकन्यांकडून होत आहे.जुलै महिन्यापासून सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीची कामे करता आली नाहीत. पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे पीक परिस्थिती चिंताजनक होती. नंतर पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची सर्व कामे आटोपली. परिस्थितीसुद्धा सुधारली होती.कपाशीचे पीक परिसरात चांगल्या प्रकारे बहरताना दिसत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित दिसून येत होत्या परंतु पावसाने काही दिवसांपासून दमदार हजेरीला सुरुवात कैली. हा पाऊस शेती पिकासाठी पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परंतु, आता पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पीक परिस्थितीत बिघाड होत आहे.सहा ते सात दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकन्यांची चिंता वाढली आहे.
Users Today : 14