सोयगाव शिक्षक भारती,सोयगाव तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

Khozmaster
2 Min Read

तहसीलदार रमेश जसवंत सोयगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उदघाटन सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव :-शिक्षक दिन व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून शिक्षक भारती संघटना,सोयगांव यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतुने सोयगांव तालुक्यातील शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन दि.20 सप्टेंबर 2022 वार मंगळवार रोजी सकाळी 10 ते 2 या वेेळात केलेले असून या शिबीरास जळगांव येथिल *डाॅ.केतन बोरोले M.S.D.N.B( मेंदू विकार तंज्ञ व मणका विकार शस्ञक्रिया तंज्ञ)डाॅ.नेहा भंगाळे M.D. Medicine (हॄदयरोग,रक्तदाब,मधुमेह,था यराॅइड,दमा,टी.बी. व छातीचे आजार,कावीड व लिव्हरचे आजार,डेंग्यू,मलेरीया,टायफाईड)डाॅ.गौरव महाजन* M.B.B.S.M.D.बालरोग तज्ञडाॅ.चेतन पाटीलM.B.B.S.D.N.B. नञरोग तज्ञडाॅ.राहूल चौधरी  B.D.S.,M.D.S.(चेहर्याचे व जबड्याचे फॅक्चर,चेहर्यावरील व तोंडावरील गाठी काढणे,गुटखा व तंबाखुने तोंड नउघडणे,चेहर्यावरील काॅस्मेटीक सर्जेरी,तोंडाचा कॅन्सर,शस्त्रक्रिये द्वारे अक्कलदाढ काढणे,दुभंगलेले ओठ व टाळू,कृञिम दात रोपण करणेया सर्व तज्ञ डाॅक्टरां मार्फत तपासणी होणार असून शिबीराचे उद्घाटन सोयगांव येथिल तहसीलदार मा.रमेश जशवंत हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणुन तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,जामनेर गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार,सोयगांव गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे ,शिक्षण विस्तार अधिकारी रंगनाथ आढाव,सचिन पाटील हे राहणार आहेत.सर्वांनी म्हणजेच लहान मोठ्यांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षक भारती सोयगांव यांच्या तर्फे करण्यात आले आहे.अशी माहिती केंद्र प्रमुख जि.प.शाळेचे मुख्याध्यापक एम.डी.सोनोने सावळदबारा यांनी बोलताना सांगितले.तसेच या शिबीरास शिक्षक सेना,प्रशासकीय विभाग सोयगांव,सर्व पञकार,पालक वर्ग,केंद्र प्रमुख संघटना,अंपग संघटना नगर पंचायत सोयगांव, शिक्षण विभाग सोयगांव यांचे सहकार्य लाभणार आहे.शिक्षक भारती,सोयगाव संघटना नेहमी शिक्षक,पालक,विद्यार्थी यांच्यासाठी विविध उपक्रम नेहमीच राबवित असते या अगोदर शिक्षक भारती सोयगांव कडून सोयगांव तालुक्यातील वर्ग पहीली मध्ये शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांना जवळपास दिड हजार कृतीपुस्तिकांचे वाटप करण्यात आले.छञपती शिवाजी महाराज जयंतीला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून 135 बॅग रक्तसंकलन करण्यात आलेले आहे.किरणकुमार वसंतराव पाटील तालुका अध्यक्ष शिक्षक भारती,सोयगाव

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *