शिवा पवार; सांगली शहर प्रतिनिधी- सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानरपालिकेने सक्रिय कृष्ठरोग आणि क्षयरोग अभियान आजपासून सुरू झाले आहे . तरी अभियान दि. 13 सप्टेंबर 2022 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात आला आहे.या अभियानासाठी 100 पथकाची नियुक्ती केली आहे. अभियानाची माहिती आणि प्रशिक्षण सोमवारी महापालिकेच्या सभागृहात झाले आहे. यावेळी आरोग्य सेवा कृष्ठरोग विभाग सांगलीचे सहायक संचालक डॉ. शिवाजी अरदार , शहर क्षयरोग अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, जिल्हा पर्यवेक्षक बी. पी. देवकर , मनपाचे टी. बी. पर्यवेक्षक नितीन देसाई , वैद्यकीय सहायक सतीश निकम उपस्थीत होते …या अभियानात प्रामुख्याने झोपडपट्टी परिसर , मजूर , वस्त्या , बांधकाम साईट आदी ठिकाणी नागरिकांकडून माहिती घेऊन त्यांना कृष्ठरोग आणि क्षयरोगाची काही लक्षणे आहेत का , असल्यास त्यांची तपासणी व रुग्णांची नोंद करणे.
सध्या शहरी विभागात 1 हजार 400 क्षयरूग्ण व 30 कृष्टरूग्ण आहेत….
Users Today : 14