खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी मेळाव्याचे आयोजन
अकोला – खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्यातून उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. परंतू नागरिकांना याबाबत कोणत्याच प्रकारची माहिती नसल्याने या शासकीय योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जिल्हयातील निंबा फाटा, आलेगांव, तेल्हारा व अकोट येथे जनजागृती मेळावे आयोजीत करण्यात आले आहे. यामध्ये मंगळवार दि. २० रोजी निंबा फाटा, ता. बाळापूर, बुधवार दि.२१ रोजी श्रीसंत मिराबाई संस्थान आलेगाव ता. पातूर, शुक्रवार दि.२३ रोजी पंचायत समिती भवन, अकोट, शुक्रवार दि.३० रोजी पंचायत समिती सभागृह, तेल्हारा येथे हे मेळावे सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळात होणार आहेत.
या मेळाव्यांना शेतकरी, उद्योजक, युवक, युवती, महिला यांनी उपस्थित रहावे व लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीमती एन.टी. लवाळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीमती एन.टी.लवाळे (८४३२९८९१२३), आर.एम. बिल्बिले, मधुक्षेत्रिक (८६९८०५७०१३) यांचेशी महसुल कॉलनी, शासकीय आयटीआय, अकोला (दुरध्वनी ०७२४-२४१४२५०) येथे संपर्क साधावा.