अकोला – राजा राममोहन रॉय यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त गुरुवार दि.२२ रोजी सकाळी ११ वाजता शालेय विद्यार्थ्यांची ‘महिला सक्षमीकरण’ याबाबत जनजागृती रॅली निघणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथून अग्रसेन चौक, टॉवर चौक, नवीन बसस्टॅण्ड या मार्गे ही रॅली जाईल व प्रमिलाताई ओक ग्रंथालय येथे या रॅलीचा समारोप होईल. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते होणार असून यावेळी मनपा आयुक्त कविता द्विवेदी, ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) डॉ. सुचिता पाटेकर, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, जिल्हा उद्योग अधिकारी निलेश निकम, जिल्हा नियोजन अधिकारी कैलास देशमुख, तहसिलदार सुनिल पाटील, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रीय अधिकरी अनंत वाघ, सहाय्यक ग्रंथालय संचालक अरविंद ढोणे यांनी उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे यांनी केले आहे.