रिठद सर्कल मधील प्रजन्यमापक यंत्र दुरुस्त करा व आम्हाला न्याय द्या -सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांचे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन

Khozmaster
1 Min Read

रिसोड, दिपक मापारी-अनेक वर्षांपासून रिठद सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे , यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि बऱ्याच शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे,, तोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावून गेला आहे बळीराजा आसमानी संकटात सापडला असून शासनाने त्याला त्वरित मदत करावी अन्यथा बळीराजाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. रिसोड तालुक्यातील सर्कल मध्ये पुढारी प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे.रिठद सर्कल मधील 1) रिठद 2)आसेगाव पेन 3)देऊळगाव बंडा 4)बेलखेडा5)पार्टी तिखे 6)खडकी डंगारे 7)येवता 8)हीवरा पेन9) वनोजा 10)कोयाळी (बु)11) कोयाळी (खू )12)दापुरी 13)वाघी (बु) या गावांमध्ये गेल्या महिन्यात 13/07/2022 ते 14/07/2022 ला कमी प्रमाणात पाऊस होऊन सदर प्रजन्यमापक कमी जास्त प्रमाणात पाऊस दाखवत असल्यामुळे दिनांक 08/08/2022 ते 09/08/2022 ला मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नदी नाले रस्ते तुडुंब भरल्याने शेती पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसते सदर पर्जन्यमापक संशयित नादुरुस्त असल्याचे दिसून येते त्यामुळे उपरोक्त बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांनी केली आहे,,

0 9 4 1 7 8
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *