मोटार पंप चोरणाऱ्या चोराच्या साखरखेर्डा पोलीसांनी आवळल्या मुचक्या.

Khozmaster
3 Min Read

सतिश मवाळ साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांत वाढ झाली असून.यामध्ये विशेषकरून ग्रामीण भागातील शेतात ठेवलेले साहित्य जसे इलेक्ट्रिक मोटार,स्टार्टर, वायर स्पिकलर गाय म्हैस बैल शेतिउपयोगी साहित्य चोरी झाल्याचं प्रमाण वाढलं आहे. शेतकरी थोडे थोडे पैसे जमा करतो, कधी बँकेचं लोन घेतो कधी नातेवाईकांकडून उसनवारी, तर कधी सोन गहाण ठेऊन व्याजाने पैसे जमवण्याचा प्रयत्न करून शेतीत प्रगती व्हावी याकरिता मोटार आणि किंवा इतर पंप बसवतो जेणेकरून प्रगत शेतीतून दोन पैसे शिल्लक येतील व त्याला घर, मुलाबाळांचे शिक्षण, आजार या सर्व गोष्टींसाठी पैसा हाताशी राहील या दृष्टीने तो शेतीसाठी मोटर विकत घेतो परंतु काही लोक शेतकऱ्यांच्या मोटारीवर लक्ष ठेवून रात्रीच्या वेळी नकळत शेतात जाऊन त्यांच्या मोटारी चोरून नेतात बाहेर अगदी कवडीमोल भावाने विकतात मिळालेल्या पैशातून तात्पुरती चैन करतात.त्यांना दोन पैसे मिळतात परंतु शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं लगेच नुकसान तर होतेच परंतु शेतात जर पाणी देण्याची वेळ असेल तर त्याची खूप मोठी गैरसोय होते व त्याच्या शेतामध्ये चांगलं पीक येण्याकरिता तो करत असलेल्या प्रयत्नांना खीळ बसते. अशा चोरट्यांना पायबंद घालावा म्हणून साखरखेर्डा पोलीस स्टेशन बऱ्याच दिवसापासून चोरट्यांचा तपास काढत होते आपण दिलेल्या छोट्या छोट्या माहितीच्या आधारे कडीला कडी जोडत आम्ही अशा चोरट्यांपर्यंत पोलीस पोहोचले. पेनटाकळी गावातून रवी शेषराव राऊत व 21 वर्षे, राम भागवत डुकरे व 21 वर्षे, अजय राजू वानखडे वय 23 वर्ष 4)नितेश दयाराम बरांडे व 29 वर्षे, ज्ञानेश्वर वासुदेव इंगळे व 22 वर्ष 6)अजय भीमराव वानखडे सर्व राहणार पेनटाकळी तालुका मेहकर यांना ताब्यात घेतलं आहे. अप. नं. 158/22 कलम 379 34 भादवी गुन्हा दाखल केला आहे. तपास सफौ काशीकर नापोका अनिल वाघ यांनी अजुन कसून चौकशी केली असता तपासामध्ये त्यांनी पेनटाकळी धरणांमधून चोरलेल्या पाच मोटारी मिळाल्या. त्यांच्याकडून अधिक मोटारी किंवा अधिक केबल चोरून नेल्याबाबत माहिती घेऊन तोही हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे साखरखेर्डा पोलिस स्टेशन चे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सफौ काशीकर नापोका अनिल वाघ हे करत आहे.ठाणेदार यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले . त्यांनी सांगितले की अणेक दिवसांपासून परिसरामध्ये चोरट्यांचे प्रमाणामध्ये वाढ होत त्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलिसाना सहकार्य करावे . पोलीस आणि जनता सगळ्यांना एकत्र येऊन अशा गोष्टींचा बंदोबस्त करावा लागेल. याकरिता आपल्याकडे असलेली माहिती जर आपण आम्हाला दिली आम्ही कोणालाही आपले नाव कळू देणार नाही परंतु तुमची माहिती ही आमच्याकरिता बहुमूल्य असते या माहितीला आम्ही तंत्रज्ञानाची जोड देऊन खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचू शकतो वमुद्देमाल हस्तगत करू शकतो. असे गुन्हे करणाऱ्यांना आपण जेरबंद करू शकतो व पुढे घडणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा बसेल तेव्हा नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी केले आहे.

0 9 4 5 8 2
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *