सोयगाव कृषी विभागाचे एस.जघ.वाघ यांचे शेतकऱ्यांना जाहीर आवाहन सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सर्व फर्दापूर, बनोटी, जरंडी, जामठी, व सावळदबारा परिसरातील शेतकरी बांधवांना सोयगाव कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे. सोयगाव तालुक्यात मागील आठवडयापासून सतत संततधार पाऊस तसेच काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. सोयगाव तालुक्यात खरीप हंगाम सन २०२२-२३ मध्ये शेतकन्यांनी पिक विमा काढलेला आहे. अशा ज्या शेतकन्यांनी पिक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांचे शेतपिकाचे नुकसान झाले असल्यास संबंधित शेतकन्यांनी स्वतः पिकः नुकसानीची घटना घडल्यापासुन ७२ तासाच्या आत भारतीय कृषि विमा कंपनीस पिक नुकसानीबाबत अवगत करणे आवश्यक आहे. तरी पिक नुकसानीबाबत भारतीय कृषि विमा कंपनीस अवगत करण्यासाठी शेतकन्यांनी खालील पर्यायाच्या अवलंब करावा.१.भारतीय कृषि विमा कंपनीस त्यांच्या 18004195004 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा . कंपनीच्या मोबाईल अॅप द्वारे नुकसानी पुर्वसुचना द्यावी.किंवा ३. विमा कंपनीचे कार्यालय (पत्ता मेन रोड सोयगाव बालाजी बजाज शोरूम व खरेदी विक्री संघ कार्यालय समोर ) येथे लेखी पत्राद्वारे पिक नुकसानीची तक्रार सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी दाखल करावी, सोयगाव तालुका कृषि अधिकारी कार्यालय, सोयगाय यांचे कार्यालयास लेखी पत्राद्वारे पिक नुकसानीची ४.तक्रार दाखल करावी. तसेच पिक नुकसानीबाबत काही प्रश्न उदभवल्यास भारतीय कृषि विमा कंपनीचे सोयगाव तालुका प्रतिनिधी श्री गजानन जाधव यांच्याशी संपर्क साधावा (मोबाईल नं. 9766092543) अशे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांनी केले आहे.