नारीशक्ती ग्रामसंघाची वार्षिक सभा.

Khozmaster
1 Min Read

आकोली येथे नारी शक्ती,दिशा क्रांती महासंघाची वार्षिक सभा अभियान व्यवस्थापक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नारीशक्ती, दिशा, क्रांती ग्रामसंघाची सर्व साधारण वार्षिक सभा घेन्यात आली, सभेत ग्राम संघातील आर्थीक व्यवहार महिलांना सांगण्यात आला. सभेत अभियानांतर्गत प्राप्त व्यवस्थापण निधी आणि वाटप, खर्च आणि प्राप्त व्याज बाबत माहिती, ग्रामसंघाचे बँक पासबुक वाचन करण्यात आले तसेच , विवीध योजना, ग्राम संघास जोडलेल्या गटानी मुद्रा कर्ज घेण्याबाबत आणि आणी ते नियमित परतफेड बाबत, ग्रामसंघ उपसमित्या गट ते ग्राम संघ यांची सविस्तर माहिती ,तसेच वैयक्तिक व्यवसाय रोजगार मेळावा इ सर्व विषयीची माहिती यांनी दिली. लंपी आजाराविषयी मार्गदर्शन वाघ यांनी माहिती देऊन घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.तसेच महिलांना स्मार्ट प्रकल्प , सुपर शोपी, आरोग्य व स्वच्छता इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित नागे पंचायत विस्तार अधिकारी,बहूरे यांनी मार्गदर्शन महिलांना केले. बँक शाखा व्यवस्थापक भोला प्रसाद,तालुका व्यवस्थापक वाघ , मांडवे ,सरपंच रोषणी मून ,ग्रामसेवक पटोकर आरोग्यसेविका फुसे , प्रभाग समन्वयक निकिता लहाने,योगेश सानप ,राहुल ,सर्व ग्रामसंघ पदाधिकारी गावातील सर्व कॅडर तसेच ग्रामसंघाला जोडलेल्या गटाच्या महिला उपस्थित होत्या

0 9 4 1 7 8
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *