अकोला – जिल्ह्यातील गाव सोनाळा येथिल शिक्षणात हुशार असणारी कु.मानसी शंकर चिकटे या मुलीचे लहानपणीच वडीलाचे छ्त्र हरवल्यावर तीची शिक्षणाची सर्व जबाबदारी मामाने घेतली होती काही वर्षांनंतर मामाचे निधन झाले आणी सर्व जबाबदारी एकट्या आईवर येऊन पडली मुलगी अभ्यासात हुशार असुन तिचा पुढील शिक्षणाचा खर्च आपण झेपणार तरी कसा पण आईने मनाने न खचुन जाता मानसीला फार्मसी फिल्डमध्ये शिक्षण देण्याच बाळगून मुलीच शिक्षण पुर्ण करण्याच ठरवल पण मोलमजुरी करून हवे तेवढे पैसे जमवणं कठीणच होते यावेळी आधारपर्व फाउंडेशन सदस्य सुनिताताई ताथोड यांनी फाउंडेशन अध्यक्षा श्रध्दाताई गढे यांना मानसीच्या परिस्थिती विषयी व शिकणात हुशार असून पुस्तकाच्या कमतरता विषयी सविस्तर माहिती सांगितली असता क्षणाचाही विलंब न करिता मानसी हिला बोलवून डी,फार्म सेकंडईअर साठी लागणारे सर्व पुस्तकं आधारपर्व फाउंडेशन माध्यमातून सर्व ग्रुप सदस्यांचा सहकार्याने मिळाले या सेवाकार्य मदतदाते गणेश पाटील,दीपक कडू,सुनीता ताथोड,नीता वायकोळे,श्रद्धा गढे, रवी नवलकर,वैशालीताई जाधव,Rk भैया,श्रीधर पाचपोर,राणीताई मोहिते,आकाश कावळे,अनिकेत जावरकर,जुगेश विश्वकर्मा यांचे अनमोल सहकार्य लाभले. त्यावेळी मानसीने आधारपर्व फाउंडेशन परिवारातील सर्व सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त मानले.