नंदुरबार: नंदूरबार आर्डीतारा येथे जिल्हा जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्रावर पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर महिला पोलीस कर्मचारी कार्यरत होत्या यावेळी मतदान केंद्रावर संदीप सुता वळवी व सचिव सुता वळवी दोघे राहणार तालुका नंदुरबार हे आरडाओरड करीत होते. यावेळी त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर जाण्यास सांगितले त्याचा राग आल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर संदीप वळवी हा धावून जात शिवीगाळ करीत लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला तसेच सचिन वळवी यानेही शिवीगाळ व दमदाटी करीत दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला याबाबत महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भादवि कलम 353, 354 ,509 ,504, 506 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत.
Users Today : 19