दिपक मापारी, रिसोड .देशमुख कृषी विद्यापिठ अकोला संलग्नीत कृषी महाविद्यालय रिसोड येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम
२०२२-२३ या अंतर्गत घोटा येथील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाऊन गांडूळखत निर्मिती प्रक्रिया व गांडूळाचे होणारे फायदे व इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने
वाटचाल.रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.माती च्या दृष्टिने गांडूळांचे व गांडूळ खता चे उपयोग:
गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते. अशाप्रकारे शेतकऱ्यांना गांडूळ खत व गांडूळ यांचे महत्त्व दिले पटवून व त्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे यावर मार्गदर्शन केले. या प्रात्यक्षिक करिता कृषि दुत वैभव खोडे , शाम शिंदे , मयुर पायघन, वैभव पाटील, प्रणय बावणे, वैभव कुरसिंगे उपस्थित होते, त्याच बरोबर शेतकरी सुदर्शन मोरे , तुकाराम मोरे , दीपक मोरे ,सुरेख सरनाईक , कैलास मोरे , नारायण मोरे व इतर शेतकरी उपस्थित होते .
या भेटीसाठी कृषी महाविद्यालय रिसोड चे प्राचार्य डॉ. आशीष अप्तुरकर, श्री. आर. एस. डवरे , रावे प्रमुख प्रा. डी. डी. मसुडकर, कार्यक्रम अधिकारी तसेच विषय विशेष तज्ञ प्रा. निलेश खडसे यांचे मार्गदर्शन लाभले.
Users Today : 14