प्रतिनिधी:-शिवाजी उदार मेराखुर्द:- चिखली देऊळगाव राजा रोडवर असलेल्या रोहडा फाटा ते तपोवन देवी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे काही समजायला मार्ग नाही या रस्त्याने वाहन चालवताना वाहनधारकांना अक्षर सातारावाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.या रस्त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही.विशेष म्हणजे हा रस्ता तपोवन देवीला जाऊन मिळतो, आता नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तपोवन ची देवी नवसाला पावणारी देवी महणून संपूर्ण तालुक्यात नाहीतर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.आणि आता नवरात्रीत या रस्त्याने रात्रंदिवस वर्दळ असते, यामध्ये अपघाताची शक्यता नाकारता येत नाही हो या अगोदर या रस्त्याने लहान-मोठे अपघात घडले आहे.नवरात्री उत्सवात देवीच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांना या रस्त्याने कसरत करत जावे लागणार आहे.कित्येक वर्षांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे परंतु कोणीही लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे लक्ष देत नाही.अनेकांनी या रस्त्यासाठी आश्वासन सुद्धा दिलेली आहे परंतु ते आश्वासन हवेतच आहे.तो रस्ता अजून जसाच्या तसाच आहे.देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण चिखली तालुक्यातील भाविक येतात याव्यतिरिक्त दूरवरुन भाविक येथे दर्शनासाठी येतात.परंतु यंदाही त्यांच्या नशिबी तोच रस्ता असणार आहे.या रस्ता दुरुस्तीचे काम ताबडतोब करण्यात यावे, अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व अन्य निवडणुकीत मतदानाचा बहिष्कार टाकू अशी मागणी या भागातील भाविक करत आहे.
Users Today : 14