_प्रतिनीधी रवि मगर- डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील ग्रामीण कृषी जनजागृती व कृषी उद्योग सलग्नितमार्फत विद्यार्थ्यांनी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच सिंदखेड राजा येथील ईश वेद बायोटेक प्रा. लि. येथे नुकतीच शैक्षणिक भेट संपन्न केली. या शैक्षणिक भेटीवेळी उपस्थित रावे विद्यार्थ्यांना कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील विषय तज्ञ डॉ. कळम यांनी कृषी विज्ञान केंद्राचा समस्त आढावा तसेच विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना तथा कार्यपद्धती समजावून सांगितल्या, तथा विज्ञान केंद्रामध्ये अद्यावत उपलब्ध तंत्रज्ञानाची देखील थेट ओळख रावे विद्यार्थ्यांना करून दिली यानंतर रावे विद्यार्थ्यांनी सिंदखेड राजा येथील ईश वेद बायोटेक या कृषी उद्योगाला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली, याप्रसंगी नवीन तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांसाठी निश्चितच लाभदायी राहील अशी अपेक्षा उद्योगाचे चेअरमन अक्षय वायाळ यांनी व्यक्त केली. सदर भेटीसाठी कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष देवानंद कायंदे व प्राचार्य नितीन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रावे समन्वयक प्रा. मोहजितसिंह राजपूत, प्रा. देवानंद नागरे, प्रा. चारुदत्त जायभाये, प्रा. ऋतुजा जाधव व सर्व रावे विद्यार्यांठी यांनी शैक्षणिक भेट सफल केली.
Users Today : 22