दहा दिवसांत कचरा न उचल्यास ग्रामपंचायत येथे टाकू भीम आर्मीचा इशाराअकोट ता प्रतिनिधी शासन ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत दरवर्षी लाखो रुपये खर्च करत आहे ग्रामविकास खात्यामार्फत ग्रामपंचायत ला दरवर्षी निधी वितरीत करण्यात येतो मात्र या निधीचा योग्य उपयोग होत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे दहीहंडा गावात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले
, नालीतील दूषित पाणी रस्त्यावर पसरले आहे, तसेच काही लोकांकडून जनावरे पाळली जातात त्या जाणवरंचे शेण खतांचे ढीगारे ठेवल्यामुळे घरांच्या आजूबाजूला जीवघेण्या आजारांचा जन्म होत असल्याने दहीहंडा येथील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, मात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही.
( दहा दिवसांत घाण कचरा उचलला नाही तर ग्रामपंचायतीत टाकला जाईल.असा इशारा भीम आर्मीच्या वतीने देण्यात आला)
दहीहंड्यात ठिकठिकाणी कचरा साचला आहे, दूषित पाणी, शेणाचे ढीग आणि घाण पसरले आहे, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे, त्यामुळे मलेरिया, टायफॉईड, डायरिया सारखे जीवघेणे आजार पसरत आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.आधीच गरीब वर्गातील लोक बेरोजगारीने त्रस्त आहेत, कुटुंबातील सदस्यांचे पालनपोषण करून जीवन जगत आहेत, अशा स्थितीत ते कसे सक्षम होणार? कचरा आणि घाणीमुळे होणाऱ्या जीवघेण्या आजारांचा खर्च कसा उचलणार? आजारांवर उपचार करणार की कुटुंबीयांची काळजी घेणार, ग्रामपंचायतीने ग्रामस्थांसमोर विकासकामांची चर्चा केली, मात्र ग्रामपंचायत प्रशासन गावातील कचरा, दूषित पाणी याकडे लक्ष देण्यास तयार नाही, जणू ग्रामपंचायतला नागरिकांच्या आरोग्यचे काहीहि देणे घेणे नाही.सार्वजनिक आरोग्याचा विचार करुन . भीम आर्मी अकोला जिल्हा प्रमुख फिरोज खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा सरचिटणीस अब्दुल मजीद यांनी ग्रामपंचायत दिलेल्या निवेदनात म्हटले आहेकी दहा दिवसाच्या आतसंपूर्ण गावातील कचरा .उचलून योग्य ती कचरायची विल्हेवाट लावावी अन्यथा संपूर्ण गावातील घाण कचरा ग्रामपंचायतच्या प्रागनाथ टाकण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
( पोलिसांकडून संरक्षणाची मागणी)
भीम आर्मीने दिलेल्या निवेदनाद्वारे गावातील स्वच्छता आणि कचरा उचलण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली असून, दहा दिवसांत कचरा उचलला नाही तर भीम आर्मीकडून कचरा उचलला जाईल. व ग्रामपंचायत कार्यालयात फेकून दिले.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दहीहंडा पोलीस ठाण्याकडून बंदोबस्ताची मागणी करण्यात आली.
गावातील लोकांना दवंडी किंवा नोटीस द्वारे कळविण्यात येईल की ज्यांच्या , घरासमोर रस्त्यावर कचराअस्यानि दोन दिवसांत कचरा उचलावा, अन्यथा दहीहंडा ग्रामपंचायत प्रशासनाकडून कचरा उचलण्याची सूचना त्यांना देण्यात येणार आहे.अन्यथा ट्रॅक्टरने कचरा गावाबाहेर फेकून दिला जाईल
ग्रामविकास अधिकारी थिटे साहेब दहीहंडा