रेल्वे स्टेशन नांदुरा येथे रेल्वे ट्रेन समोर येऊन येरळी येथील एक इसमाची आत्महत्या ओमसाई फाउंडेशन नांदुरा चे लोहमार्ग पोलिसांना सहकार्य

Khozmaster
1 Min Read

रेल्वे स्टेशन नांदुरा येथे रेल्वे ट्रेन समोर येऊन येरळी येथील एक इसमाची आत्महत्या ओमसाई फाउंडेशन नांदुरा चे लोहमार्ग पोलिसांना सहकार्य

श्रीकांत हिवाळे, नांदुरा प्रतिनिधी :-
दि.22.09.22 रोजी अंदाजे 09.30 वाजता km no 523 जवळ महाराष्ट्र एक्स समोर येऊन एक इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडल्याची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस शेगाव चे सुनील कवळकर ,गजानन मेटांगे आरपीएफ झनके व ओमसाई फाउंडेशन चे विलास निंबोळकर ,पियुष मिहानी हे ऍम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी पोहचले.घटनास्थळी मिळालेल्या मोबाईल मधील नंबर वरून मृतकाची ओळख पटवली .मृतक मुलगा हा येरळी येथील दिपक लक्ष्मण काकने वय 28 वर्ष हा असल्याचे निष्पन्न झाले.लोहमार्ग पोलीस स्टेशन शेगाव येथे मर्ग नंबर 30/22 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे दाखल केला .घटनास्थळावरून वरून प्रेत ओमसाई फाउंडेशन च्या स्वयंसेवक यांनी ऍम्ब्युलन्स पर्यन्त आणून सरकारी दवाखाना नांदुरा येथे पोहचवले . ओमसाई फाउंडेशन नांदुरा चे विलास निंबोळकर पियुष मिहानी ,श्रीकृष्ण वसोकार यांनी लोहमार्ग पोलिसांना सदर कार्यवाहीत मदत केली .मृतकाच्या आत्महत्या बाबत पुढील तपास लोहमार्ग पोलीस सुनील कवळकर करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *