देवेंद्र सिरसाट.नागपूर.श्री शिवाजी शिक्षण संस्था , अमरावतीचे कार्यकारिणी सदस्य हेमंत वासुदेवराव काळमेघ हे नुकत्याच पार पडलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने कार्यकारिणी सदस्य म्हणून पुनश्च निवडून आलेले आहेत . निवडणूकीनंतर प्रथमच त्यांचे नागपूर शहरात आगमन झाले असता नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी आजीवन सभासदांसोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग परिसरातील डॉ . पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळयास माल्यार्पण करून अभिवादन केले . या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना संस्थेच्या आजीवन सभासदानी मागील कार्यकारिणीवर विश्वास ठेवून कार्य करण्याची पुनश्च संधी दिल्याबद्दल माननीय आजीवन सभासदांचे नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या वतीने आभार मानले . डॉ . भाऊसाहेबांच्या आशीर्वादाने मागील पाच वर्षात संस्थेची विकासात्मक वाटचाल यापुढेही अशीच अधिक जोमाने सुरु राहील अशी ग्वाही त्यांनी दिली . भाऊसाहेबांनी हिमालयाच्या उंचीचे कार्य करुन ठेवलेले असुन श्री शिवाजी शिक्षण संस्था आज महाराष्ट्रच नव्हे तर देशात आपल्या शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल ओळखले जाते . भाऊसाहेबांची दुरदृष्टी ही भविष्यातील पाऊले ओळखणारी होती . आजही त्यांच्याच विचारावर संस्था कार्यरत असुन त्यांच्याच प्रेरणेने भविष्यातही वाटचाल असेल यासाठी आपले आशीर्वाद व आपली मोलाची साथ राहील अशी आशा हेमंत काळमेघ यांनी व्यक्त केली . संस्थेच्या विकासामध्ये संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मोलाचे असते . तुम्हा सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य असेच कायम राहिल अशी आशा ही काळमेघ यांनी व्यक्त केली . या कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद अशोकराव म्हात्रे , माजी प्राचार्य माणिकरावजी अंधारे , प्रा . बापुरावजी निमकर , प्रफुल्लराव देशमुख तसेच संस्थेचे आजीवन सभासद व डॉ . पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख पुतळा परिसर महाराजबाग , नागपूर सौदर्यीकरण समितीचे सचिव बबनराव चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते . याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व्दारा संचालित विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . महेंद्र ढोरे , धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . जे . डी . वडते , शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गणेश नगर , नागपूरचे मुख्याध्यापक विरेंद्र मुरळ , विद्यामंदीर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय , कोराडीच्या मुख्याध्यापिका ज्योति राऊत आणि संस्थेच्या नागपूर शहरातील चारही शाळा / महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संस्थेवर प्रेम करणारे अनेक गणमान्य उपस्थित होते . हेमंत काळमेघ यांचे शिवाजी विज्ञान महाविद्यालयात स्वागत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग परिसरातील डॉ . पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळयास माल्यार्पण करून शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आगमन झाले . महाविद्यालयातील डॉ . पंजाबराव उपाख्य भाऊसाहेव देशमुख यांच्या पुतळयाला हारार्पण करून अभिवादन केले . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा . महेंद्र ढोरे यांनी पुष्पगुच्छ देवून सर्व महाविद्यालयीन सहकाऱ्यांच्या वतीने स्वागत व अभिनंदन केले . याप्रसंगी महाविद्यालयातील प्रत्येक विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांचे पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले . याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .