देवेंद्र सिरसाट.नागपूर. हिंगणा नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी. तालुक्यातील प्रसिद्ध डिगडोह देवी येथे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून यावर्षी भाविकांसाठी मंडळाच्या वतीने मध्य प्रदेशातील मैहर च्या शारदा-भवानी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात येत आहे. यासाठी मागील पंधरा दिवसांपासून तयारी सुरू असून हिंगणा मुख्य मार्गावर भव्य प्रवेशद्वार उभारून त्यापासून डिगडोह या १ किमी अंतरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. याशिवाय भाविकांच्या मनोरंजनासाठी झुले, डीझनिलँड शो ,प्रदर्शनीची सुद्धा तयारी सुरु आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला.यावर्षी कुठलेही निर्बन्ध नसल्याने पहिल्याच दिवसापासून हजारो भाविक येथे हजेरी लावतील अशी शक्यता दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी गौतम गोस्वामी, हरिहर निखाडे, अनिल कोल्हे, संतोष गुंजार, संजय कोल्हे, करण पुसनाके,ब्रिजेश मिश्रा,बंटी भांगे,दीपक निशाणे ,दिनेश पंडित, ,नित्यानंद छोटराय,संतोष यादव, सुशील कोल्हे,सुनील वाढवे,पंकज किलनाके, कमलेश ढबाले आदींनी व्यक्त केली आहे.