श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी – क्रेडिट बेस्ड चॉईस सिस्टीमवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीप्रभू चापके हे होते , तर प्रमुख उद्घाटक म्हणून दी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय एडवोकेट मोतीसिंह मोहता हे उपस्थित होते . विषयतज्ज्ञ म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर किशोर राऊत हे होते .
कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाला .उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले . महाविद्यालयाच्या आय क्यू ए सी चे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर योगेश अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले . दी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एडवोकेट श्री मोतीसिंह मोहता यांनी सीबीसीएस बद्दल आपले विचार मांडत आपल्या मनोगतातून उपस्थितांशी संवाद साधला .त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष , प्राचार्य डॉक्टर श्रीप्रभू चापके यांनी सीबीसीएस मुळे होणाऱ्या परिवर्तनाची नोंद घेत आपले अध्यक्षीय विचार व्यक्त केले . संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात या कार्यशाळेचा सामायिक उद्घाटन समारंभ सुरू असताना दृकश्राव्य प्रणालीद्वारे अंदाजे 400 महाविद्यालयांचे 11000 प्राध्यापक आणि 70 प्रशिक्षक जोडले गेलेले होते . विद्यापीठ स्तरावरील या उद्घाटन सोहळ्यात राज्यपाल माननीय भगतसिंग कोशारी ,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे , श्री अनिल सहस्त्रबुद्धे , श्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव , उच्च व तंत्र शिक्षण -श्री रस्तोगी ; तसेच प्रकुलगुरु डॉक्टर चौबे यांनी मार्गदर्शन केले . आभार प्रदर्शनानंतर प्रत्येक केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने सीबीसीएस प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली .दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत तीन सत्रांमधून सीबीसीएस प्रणाली मधून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमाविषयी , अध्यापनविषयी , मूल्यमापनाविषयी , मंथन करण्यात आले .चौथ्या सत्रात खुली चर्चा आयोजित करण्यात आली ,ज्यामध्ये उपस्थित प्राध्यापकांनी
विषयतज्ज्ञांकडून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले .
श्रीमती ल रा तो वाणिज्य महाविद्यालयातही या पद्धतीने चार सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सर्व सत्रांमध्ये सदर महाविद्यालयाच्या प्राध्यापक वर्गासह श्री आर एल टी विज्ञान महाविद्यालय ,अकोला ;सुधाकर नाईक कला व उमा शंकरखेतान वाणिज्य महाविद्यालय, अकोला ; जोशी आर्यभट्ट महाविद्यालय , मलकापूर आर्ट्स कॉलेज ,आणि अकोला कॉलेज ऑफ जर्नालिझम या सर्व महाविद्यालयांमधून सुमारे १२९ प्राध्यापकांनी सहभाग घेतला . कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात समारोप समारंभ आयोजित करण्यात आला .सुधाकर नाईक कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बोबडे यांनी याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला . या संपूर्ण कार्यशाळेचे संचालन डॉक्टर मोनिका साबू यांनी केले तर डॉक्टर निलेश चोटीया यांनी आभार प्रदर्शन केले . सर्व सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले . सामूहिक राष्ट्रगीत गायनाने या दिवसभर चाललेल्या सीबीसीएस कार्यशाळेचा समारोप झाला.