मुजोर पोलीस सतीश मुळेंवर तात्काळ कारवाई न केल्यास टॉवर आंदोलन करणार:-गजानन बोरकर

Khozmaster
2 Min Read

 

मेहकर :- मेहकर (कार्यालय प्रतिनिधी)
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून भारत देशाची संपूर्ण जगात ओळख आहे आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार भारत देशात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे आणि समाजाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून देशात स्वतंत्र गृहविभाग म्हणजेच पोलिसांचा विभाग आहे मात्र अलीकडच्या काळात पोलीस विभागातील काही मुजोर अधिकारी व कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत असून अन्यायग्रस्तांनी नेमका न्याय मागायचा तरी कुणाला ? पोलीस विभागा व्यतिरिक्त ईतर विभागात भ्रष्टाचाराच्या किंवा इतर घटना घडल्या तर पोलीस विभागाकडून त्या ठिकाणी तात्काळ कारवाया करण्यात येतात मात्र मेहकर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अजब प्रकार पहायला मिळत आहे मेहकरसह डोणगाव व इतर ठिकाणी कार्यरत असलेले वादग्रस्त मुजोर पोलीस कर्मचारी सतीश मुळे यांच्यामुळे अनेकांना त्रास झालेला आहे सतीश मुळे ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत काम करतात त्या ठिकाणी दादागिरी व पोलिसगिरी अंगात आणतात असे अनेक वेळा दिसून आलेले आहे व त्याचा परिणाम सुध्दा सतीश मुळेंना भोगावा लागला आहे मात्र नियमानुसार ठोस व कडक कारवाई होत नसल्याने सतीश मुळें सारख्या पोलीस कर्मचाऱ्यांची दिवसेंदिवस हिंमत वाढत असून असे प्रकार पोलीस विभागात घडत असतील व मुजोर पोलीसांवर कारवाई होत नसेल तर गोरगरीब व अन्यायग्रस्त लोकांनी कोणाकडे न्याय मागायचा हा यक्षप्रश्न उपस्थित होत असून वादग्रस्त मुजोर पोलीस सतीश मुळे यांच्या प्रकरणाचा तपास करुन वरिष्ठांना अहवाल पाठविण्याची जबाबदारी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे असतांनाही प्रकरण घडून तब्बल १५ दिवस उलटून गेल्यानंतरही कोणताही चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला नाही व वादग्रस्त मुजोर पोलीस सतीश मुळे यांच्यावर कुठलिही कारवाई न करता त्यांना पोलीस विभागाकडून पाठीशी घालण्याचा प्रकार सुरु असल्याचे सांगून जोपर्यंत सतीश मुळेंवर कडक कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील कोणत्याही टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांनी दिला असून याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण मेहकर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *