अखेर ते सहा मुले त्यांचे घरी परत आले

Khozmaster
2 Min Read

नाशिक : प्रतिनिधी ( संजय धाडवे) मेंढया चारण्यासाठी पारनेर तालुक्यात इगतपुरी येथून आणलेल्या सहा अल्पवयीन मुलांना शनिवारी पारनेर महसूल प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. या मुलांना मी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या प्रकरणी मेंढपाळ बांधवांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले होते, यात मी व माझ्या सहकाऱ्यांनी मध्यस्थी करत मेंढपाळांवर कारवाई न करता त्यांनी त्यांच्याकडील मुले सुपूर्द करण्याच्या अटीवर शनिवारी सहा मुले प्रशासनाच्या हवाली केले. पारनेर तहसिलदार या मुलांना इगतपुरी तहसिलदारांकडे सुपूर्द करणार आहेत. त्यानंतर इगतपुरी तहसिलदार ही मुले त्यांच्या आईवडीलांकडे पोहच करण्याची प्रक्रिया पार पाडतील.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील अल्पवयीन मुले, मुली पारनेर व संगमनेर तालुक्यात आणण्यात येऊन त्यांच्याकडून मेंढ्या चारण्याचे काम करून घेतले जात असल्याचे प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पारनेर तालुक्यातील चार व संगमनेर तालुक्यातील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर अशिक्षीत असलेल्या मेंढपाळ बांधवांमध्ये भितीचे वातावरण होते.

या प्रकरणात मी विशेष लक्ष घालून, पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन या घटनेमुळे अशिक्षित असलेल्या सर्वच मेंढपाळ बांधवांना पोलिस प्रशासनाकडून नाहक त्रास होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. माझ्या समवेतच आमदार निलेश लंके मेंढपाळ कल्याणकारी संघटनेचे गणेश आप्पा हाके यांच्यासह दामू टकले, धोंडीभाऊ टकले, बाळासाहेब पोकळे, संतोष गोयेकर व अभिनेता शरद गोयेकर यांनी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष मा.आ.विवेक पंडीत यांची भेट घेत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. मा.आ.पंडीत यांनीही याप्रकरणी योग्य समन्वयाची भूमिका घेतली होती. त्यानंतर संगमनेर येथे मा. आ.पंडीत यांच्या उपस्थितीत पोलिस व महसूल विभागाच्या अधिकारी, माझे सहकारी ऍड.राहुल झावरे, गणेश अप्पा हाके यांच्यात पार पडलेल्या बैठकीत ज्या मेंढपाळांकडे अल्पवयीन मुले मेंढया चारण्यासाठी ठेवण्यात आलेली आहेत त्यांनी ती शनिवारपर्यंत पोलिस व महसूल प्रशासनाच्या उपस्थितीत त्यांच्या आई वडीलांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देत सहा अल्पवयीन मुलांना पोलिस प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले!

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *