नवरात्रीनऊ साड्या
शक्कल कशी काय
धन्यधन्य दुकानदार
सुरू नवा व्यवसाय
सेल जिकडे तिकडे
आमचे वळती पाय
हट्ट विशिष्ट रंगाचा
आमचा रे निरूपाय
सवय लावून नवीन
कुणी विकतो साय
खिसा खाली भरारा
कुणी मलिदा खाय
ऑनलाइन रे खरेदी
झकास काढा उपाय
दिवसात कोरोनाच्या
नको व्हाया अपाय
अर्धवस्त्र गरीबकाही
जगती भगिनी माय
द्यावा कपडा एखादा
सुचेना सुरेख उपाय
– हेमंत मुसरीफ, पुणे
9730306996..
www.kavyakusum.com
Users Today : 1