बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) छत्रपती क्रांती सेना, बामसेफ व बामसेफच्या सर्व अपशूट विंगच्या वतीने शनिवारी रायगडावर बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा शाक्त राज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रबोधन सभा संपन्न झाली, या प्रसंगी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून प्रबोधन सभा संपन्न झाली. या सभेचे प्रास्ताविक मा. सचिन शिर्के सर प्रोटॉन राज्य उपाध्यक्ष यांनी केले. तर प्रमुख मार्गदर्शन विशाल लोमटे सर राज्य संयोजक छत्रपती क्रांती सेना यांनी केले. तसेच मनोज महाले सर राज्य उपाध्यक्ष बहुजन क्रांती मोर्चा यांनी आपल्या कार्यक्रमाचा ब्राह्मण व्यवस्थेवर कसा परिणाम होत आहे हे समजावून सांगितले. अध्यक्षता मा रवींद्र राणे सर राष्ट्रीय संरक्षक छत्रपती क्रांती सेना यांनी केली या वेळी मार्गदर्शन करताना राणे सर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मण पद्धतीने केलेला पहिला राज्याभिषेक नाकारला व शाक्त पद्धतीने दुसरा राज्याभिषेक नाशिकच्या निश्चल पुरी गोसावी यांच्या हस्ते करून घेतला. याचाच अर्थ महाराजांनी त्याकाळी असणारी ब्राह्मणी व्यवस्था नाकारली अर्थातच हाच खरा राज्य भिषेक आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही संपल्या नंतर वास्तविक पाहता मुघळशाही यायला हवी होती. पण तसे न होता पेशवाई कशी आली? हा गंभीर विषय असून बहुजनांनी यावर विचार करायला हवा. असे परखड मत व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा धोका नव्हता मात्र आज वर्तमान ब्राह्मणी व्यवस्थेत शेतकऱ्याचा जीव धोक्यात आला आहे. त्यासाठी व्यवस्था परिवर्तनाची लढाई लढावी लागणार आहे. म्हणून सर्व 85 % बहुजन समाज एक झाला पाहिजे. तरच शिवशाही पुन्हा आपण निर्माण करू शकतो असा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरला तो छोटा मुस्लिम कार्यकर्ता तसेच या कार्यक्रमासाठी मुस्लिम, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्या ज्या कार्यकात्यानी योगदान दिले त्यांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रचंड उत्साहात व भर पावसात हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.