पुनर्वसन करण्याची मागणी : ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
चोहोट्टा बाजार येथून जवळच असलेल्या नखेगाव येथील नदीकाठच्या ५० घरांना धोका असून, या घरांचे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली.
अकोट तालुक्यातील नखेगाव हे गाव शहानूर नदीच्या काठावर वसले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या नदीचा भाग खचल्याने या भागात राहणान्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे परिसरात वास्तव्यास असलेल्या ५० घरांना धोका निर्माण झाला. या परिस्थितीबाबत ग्रामपंचायत
प्रशासनाने येथील रहिवाशांना सूचना दिल्या आहेत. संकटात सापडलेल्या ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देऊन पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी दिलीप सुलताने, प्रवीण मुंडाळे, विनोद बिल्लेवार, भावेश डोंगरे, सुभाष रामचवरे, महादेव बघे, सुनील रामचवरे, अमर मुंडाले, भावेश डोंगरदिवे, राजू मोरोदेसह इतरही ग्रामस्थ उपस्थित होते.