प्रदेशाध्यक्षपदी इंजि. डी. टी. शिपणे यांची निवड
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात चर्मकार समाजाची लोकसंख्या कमी असली तरी शेकडो संघटना कार्यरत आहेत. गुरु रविदासांच्या परिवर्तनवादी विचारावर चालणाऱ्या देशातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन दखलपात्र समाज घडवण्यासाठी कार्य करावे या उद्देशासाठी लातूर येथे राज्यस्तरीय बैठक नुकतीच संपन्न झाली.
या बैठकीला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय गुरु रविदास समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव अगावणे (सोलापूर) यांनी आपल्या पहाडी आवाजात समाजाने तसेच समाजातील विविध संघटनांनी एक होऊन समाजाला एक सक्षम व आदर्श समाज बनवायचे आहे असे आपल्या भाषणातून नमूद केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. संतोष वाघमारे हे होते.
प्रमुख पाहुणे तथा संघटनेचे राष्ट्रीय मुख्य संघटक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर (नांदेड) यांनी मागच्या ४० वर्षातील सामाजिक चळवळीचा इतिहास सर्वांसमोर ठेवला. चर्मकार समाजातील कार्यकर्ता कसा असावा हे पटवून देताना तो लढवय्या व वेळ, पैसा, बुद्धी देणारा त्यागी असला पाहिजे असे मत मांडले. कार्याध्यक्ष शिवाजीराव लकवाले यांनी आपल्या समाजाचे राजकारणात काय स्थान आहे ? शासन प्रशासनात आपली माणसं असणं आवश्यक आहे हे सांगितले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राचार्य आर. डी. निटूरकर यांनी लिंगायत चळवळीतील संत हरळ्ळया यांचे योगदान यावर भर दिला. कर्नाटक बिदर येथून आलेले समाज बांधव ईश्वर कन्हेरी, सुभाष टिळेकर यांनी आम्ही महाराष्ट्रातील चर्मकार बांधवांसोबत आहोत हा विश्वास दिला. यावेळी उमेश बोरोळे (भालकी), गोपाळ सुर्यवंशी (आळवाई), सौ. मीनाताई जाधव (बिदर), सौ. महानंदा शेवाळे (परळी), इंजि. डी. टी. शिपने (औरंगाबाद) यांनीही आपले विचार मांडले. बाबुराव वाघमारे यांनी गीत सादर केले.
या बैठकीच्या निमित्ताने चर्मकार समाजातील डॉ. सतीष सातपुते (निलंगा), चि. पीयूष चव्हाण, चि. ऋषिकेश वाघमारे, अस्मिता कांबळे या गुणवंतांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक बालाजी साबळे यांनी तर सूत्रसंचलन खंडेराव बनसोडे यांनी केले. शेवटी आभार एड. संजय सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमास महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्षपदी इंजि. डी. टी. शिपणे यांची निवड
राष्ट्रीय गुरु रविदास समता परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी औरंगाबाद येथील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इंजि. डी. टी. शिपणे यांची निवड यावेळी घोषित करण्यात आली. आपण लवकरच महाराष्ट्राचा दौरा करुन चर्मकार समाजातील सर्व पोटजाती राष्ट्रीय गुरु रविदास समता परिषदेत सहभागी करुन घेऊ असे आश्वासन इंजि. शिपणे यांनी यावेळी दिले. त्यांचा यावेळी निवडीबद्दल भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ज्ञानदेव राजगुरु (उस्मानाबाद), टी. जी. कांबळे (पंढरपूर), नंदकुमार कांबळे (कोल्हापूर), पूर्व युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे, पूर्व राज्य उपाध्यक्ष इंजि. अशोक भोसले (बुलडाणा), अरविंद तायडे (नागपूर), प्रा. राम गायकवाड (बीड), अशोक दामावले (भालकी), श्रीरंग परिहार (कमालनगर), नारायण राजगुरु (बार्शी), संभाजी कांबळे (रुकडी, कोल्हापूर), विष्णू चव्हाण, शंकर चव्हाण, चंद्रकांत लोखंडे, विजयमाला चव्हाण, शोभा भोसले (सर्व कोल्हापूर), सुशीला पांडव (हातकणंगले), भीमराव वाघमारे, शिवराज कांबळे, शिवाजी सोनटक्के (सर्व नांदेड), माधव सुर्यवंशी (हदगाव, नांदेड), राजकुमार बनसुडे, सुर्यकांत रायकोडे (लातूर), माधव सुर्यवंशी (चाकुर), प्रा. राजकुमार वाघमारे, श्रीनिवास वाघमारे, प्रा. युवराज वाघमारे, प्रा. विनायक वाघमारे, सुधाकर पवार, धनाजी लखनगावे (शिरुर अनंतपाळ), प्रा. भरत वाघमारे, विठ्ठल कांबळे, संतोष वाघमोडे, उमाकांत यादव, पिंटू सुर्यवंशी, रामदास नवखंडे, मालन राऊत, छाया बनसोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबुराव वाघमारे, सुधाकर पवार, सुभाष सुर्यवंशी, अरविंद दामावले, नेताजी राऊत, संतोष वाघमोडे, उमाकांत यादव, संतोष कांबळे, वैजनाथ नाबदे, अविनाश वाघमारे, गोविंद चव्हाण, रामदास नवखंडे आदींनी परिश्रम घेतले.
Users Today : 27