जळगाव जामोद दिनांक 25तालुक्यातील सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयास पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने शाळेत सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम संपन्न झाला. स्व.डोंगरसिंह (भैय्यासाहेब) यांनी सूनगावामध्ये या विद्यालयाची स्थापना 1972 ला केलीलि आहे. त्या इवल्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. त्यानंतरच्या काळात शाळेच्या अध्यक्षपदाची धुरा स्व श्री. दर्यावसिंह राजपूत यांनी समर्थपणे पार पडली. आता या शाळेचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. डॉ. कुलदीपसिंह राजपूत यांची नेमणूक होऊन त्यांच्याच संकल्पनेतून सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम साजरा होत आहे. यावेळी माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा मेळावा व सत्कार घेण्यात आला . मंचावर विद्याभारती शैक्षणिक मंडळ, अमरावती चे सचिव श्री. चौहान , कार्यालय सचिव श्री. एन .वाय. पाटील साहेब, प्रा. श्री. सोमवंशी सर, विद्यालय स्थानिक समिती अध्यक्ष प्रा. डॉ. कुलदीपसिंह राजपूत, राजकुमारसिंह राजपूत, श्रीमती ज्योतीबाई राजपूत, मुख्या. इंगळे सर, पांडु गवई इ. उपस्थित होते.कार्यक्रमात विद्यालयामार्फत माजी शिक्षक श्री पी. आर. जाधव सर, श्री कोकाटे सर, सौ सौ .अंबडकार मॅडम यांचा तसेच शाळेच्या माजी विद्यार्थी यांचा सत्कार प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.मा. न. विद्यालयाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. डॉ. कुलदीपसिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी संस्थाध्यक्ष श्री रावसाहेब शेखावत आदर्श विद्यार्थी पुरस्कार, श्री देवीसिंह शेखावत अवॉर्ड , माजी राष्ट्रपती महामहीम सौ प्रतिभाताई पाटील आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार, स्व. दर्यावसिह राजपूत इंग्रजी भाषा प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले. विद्याभारती शैक्षणिक मंडळ सचिव श्री. चौहान साहेब यांनी विद्यालयाला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर प्रा. कुलदीपसिंह राजपूत यांनी शाळेमध्ये गुणवत्ता, शिस्त आणि चारित्र्य हे गुण वाढीस लावण्यास कटिबध्द आहोत, तसेच शाळेला जिल्ह्यातील सर्वोत्तम शाळा बनवण्याचा प्रयत्न करू, रुरल टॅलेंट शोधून त्यास चालना देऊ असे मत व्यक्त केले आहे. या यावेळी सर्वश्री. राजकुमारसिंह राजपूत, राजाभाऊ कोकाटे सर, अंबडकर मॅडम, संतोष भाऊ कतोरे, बळीराम वंडाळे ,पांडुरंग गवई मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोटेकर मॅडम यांनी तर आभार सोळंके सर यांनी केले. कार्यक्रमासाठी मुख्या. इंगळे सर आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Users Today : 30