प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव 2023 छ. संभाजीनगर ची कार्यकारणी व नियोजन जाहीर

Khozmaster
4 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव हा प्रभू विश्वकर्मा युवा एकत्रीकरण बचत गट मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा करत असतो याही वर्षी प्रभू विश्वकर्मा युवा एकत्रीकरण बचत गटांनी प्रभु विश्वकर्मा  जयंती मोठ्या उत्साहाने  साजरी करण्याची ठरवले आहेत. यावर्षी प्रभु विश्वकर्मा जयंतीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे पत्रिकेच्या माध्यमातून प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमा व प्रभू विश्वकर्मा युवा एकत्रीकरण दिनदर्शिका प्रत्येक समाज बांधवाच्या घरामध्ये प्रभू विश्वकर्मा युवा एकत्रीकरण बचत गटाचे सदस्य व समाज बांधव पोहोच करत आहेत.
 प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्त आठ दिवस विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये 26, 27व 28 फेब्रुवारीला इंजिनीयर श्री किसन पोपळघट व श्री रावसाहेब कळसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाढे वाचन स्पर्धा,निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. प्रभू विश्वकर्मा यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच 3 फेब्रुवारीला सकाळी आठ ते नऊ महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.नऊ ते दहा छोट्या मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोबतच दहा ते साडेदहा प्रभू विश्वकर्मा यांचे सप्तनद्याचे आणलेल्या   जलाभिषेक श्री लक्ष्मीकांत हरेल श्री दिगंबर हरेल, निरंजन हरेल, केशव हरेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. साडेदहा ते अकरा प्रभू विश्वकर्मा यांच्या महाआरतीचे आयोजन श्री संदीपान थोरात, श्री रमेश दिसागज  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेले आहे.* *यामध्ये 40 सपत्नीक जोडप्यांच्या हस्ते महाआरती घेण्यात येणार आहे. अकरा ते साडेअकरा या वेळेत सर्व मंत्री महोदय व प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात येणार आहे. साडेअकरा ते एक या वेळात सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट अभय टाकसाळ व संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रा. डॉ. संजीवकुमार पांचाळ यांचे मार्गदर्शन होणार आहे. एक ते सव्वा एक लोहार समाजातील समाज परिवर्तनासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या दहा जोडप्यांचे सपत्नीक स्वागत करण्यात येणार आहे.तसेच सव्वा एक ते दीड पर्यंत रांगोळी, पाडे वाचन, भाषण, फॅन्सी ड्रेस, स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सहभागी विद्यार्थ्यांना देखील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दीड ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलेला आहे.प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सवाचे अध्यक्ष म्हणून श्री संदीप वैद्य,उपाध्यक्ष योगेश कव्हळे,सचिव निलेश थोरात,कोषाध्यक्ष श्री दुर्गादास वैद्य,सहसचिव श्री प्रशांत हरेल,सहकोशाध्यक्ष अध्यक्ष विजय पडघनकर कार्याध्यक्ष श्री दिगंबर हरेल श्री रवी कवळे श्री संतोष लोहार स्वागत अध्यक्ष डॉ. राजु पोपळघट
 प्रसिद्धी प्रमुख श्री संदिपान थोरात श्री अनिल चाफा कानडे श्री समीर मतलाने
यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली आहे.
या मीटिंगसाठी श्री.रमेश दिसागज,श्री.अनिल चापाकानाडे, श्री.किसन पोपळघट,श्री.रावसाहेब कळसे,श्री दत्ता पोपळघट,श्री शंकर पोपळघट,
 श्री गणेश खंडागळे, श्री.निरंजन हरेल, श्री.आशिष हरेल,श्री.रवी थोरात, श्री.दीपक कवळे,श्री. विठ्ठल हिवाळे, श्री.गणेश हिवाळे, श्री.प्रवीण बादले,श्री.दत्ता बादले, श्रीकृष्ण टाकसाळ,श्री.गणेश तांबे, श्री.किशोर दिसागज,श्री. कल्याण मते,श्री.ईश्वर मते,श्री. गजानन जगताप,संतोषी हिवाळे ताई, श्री.उद्धवराव हरेल,श्री दगडूजी खैरनार,श्री.अशोक हिवाळे,श्री.बापू कवळे,श्री. बाबुराव कवसकर,श्री.श्रीरंग विघे श्री अंकुश लाड,श्री.अंक्रुर हरेल, श्री.किसन डाखोरकर,श्री.रामेश्वर वाघ,कव्हळे साहेब,प्रा. डाॅ.शैलेंद्र भादले,श्री विठ्ठल डाखोरकर,श्री.उत्तमराव कवळे,श्री.शेषराव पोपळघट,श्री बाबुराव हिवाळे,श्री संजय कवाळे, श्री पवन पोफळे श्री प्रदिप हरेल,श्री.लक्ष्मीकांत हरेल श्री नाना रूम,श्री.रमेश हरेल,श्री पांडुरंग थोरात,श्री मनोहर तांबे, श्री विजय दिसागत,श्री वाल्मिक मतलबी,श्री देविदास पोपळघट,श्री.राजु हरने,श्री.विलास डाखोरकर.हे उपस्थित होते.
श्री प्रभू विश्वकर्मा जयंती चे नवनियुक्तअध्यक्ष यांनी 3 फेब्रुवारीला सर्व लोहार समाज, सुतार, शिल्पकार,तांबटकर, सोनार समाज बांधवांनी या जयंतीचा लाभ घेऊन विश्वकर्मा जयंती ची शोभा वाढवावी हे आव्हान  विनंती केली. हा सर्वेसर्वा कार्यक्रम शास्त्रीनगर सहकार गृहनिर्माण संस्था हॉल हेडगेवार हॉस्पिटल च्या पाठीमागे छत्रपती संभाजी नगर येथे होणार आहे.
0 9 4 7 4 1
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *