सोयगाव प्रतिनिधी /गोकुळसिंग राजपूत :-तालुक्यातील मोलखेडा येथे मागील आठ ते पंधरा दिवसामधे सोलर पॅनल,झटका मशीन,बटरी चोरी झाली होती.अशा तक्रार दाखल करण्यात आली होती.या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील शेतक-यांचे विहीरीवरील पंप, झटका मशिन, सोलार पॅनल व बॅटरी व इतर साहित्य चोरी करणा-याचा शोध घेवुन त्यांना जेरबंद करण्याबाबत सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या आहेत.यावरुन सिल्लोड उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. विजय मराठे साहेब यांनी अशा गुन्हयांचा जलद गतीने तपास करण्याबाबत मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकिस आणुन अशा घटनांना आळा बसणे कामी मार्गदर्शन केले. यावरुन फर्दापुर पोलीस स्टेशनचे सपोनि अधिकारी भरत मोरे हे त्यांचे तपास पथका फर्दापुर शिवारातील मोलखेडा गांवामध्ये गु.र.नं. २५/३/२०२३ कलम 379 मध्ये चोरी झालेले शेती अवजारे ही मोलखेडा येथील एक इसम यांने घेतल्यांची गोपणिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वरिल गुन्हयात गेलेला शेतकरीचा चोरीचा मददेमाल अमोल कैलास शेळके वय 26 वर्षे व्यवसाय शेती रा. मोलखेडा ता. सोयगांव यांने खरेदी करुन तो त्यांच्या स्वतः च्या शेतामध्ये वापरत आहे असी माहिती मिळताच सपोनि भरत मोरे व त्यांचे पथक वरील इसमांचे शेतामध्ये जाऊन पाहनी केली असता सदर चा मुददेमाल हा शेतामध्ये बॅनरच्या आड लापविलेला होता तो उघडुन बघितला असता तेथे 4200/- कि.ची इंडो कंपणीची बॅटरी जिचा नंबर खोडलेल्या स्थितीमध्ये व त्यावर निळया रंगाचा पेन्ट मारलेला व 7500/- कि.चा सौर उर्जेची प्लेट व झटक्याचे मशीन 100 डब्लुपी-10 केव्ही चे मशीन कि. अं. असा एकुन 11700/- रुपये किंमतीचा मुददेमाल मिळाला. त्यांनतर चोरीचा मुददेमाल घेणार इसम नामे अमोल कैलास शेळके वय 26 वर्षे व्यवसाय शेती व मजुरी रा. मोलखेडा ता. सोयगांव यांचे कडुन माहिती घेवुन चोरी करुन चोरीचा माल विकणारा मुख्य आरोपी नामें मिथुन उर्फ इश्वर बाबु चव्हान वय 32 वर्षे, व्यवसाय शेती व मजुरी रा.नांदा तांडा ता. सोयगांव यांचे नांव तपासामध्ये समोर आल्यांनतर त्याला पोलीसांनी नांदतांडा येथून ताब्यात घेवुन त्यांना अटक करण्यात आलेली असुन सध्या चोरी करणारा आरोपी नामे मिथुन उर्फ इश्वर बाबु चव्हान व चोरीचा माल घेणारा आरोपी नामे अमोल कैलास शेळके यांना दोघांना अटक करण्यात आलेली असुन ते पोलीस कस्टडीमध्ये असुन पोलीसामार्फत त्यांचे आनखी कोणी साथीदार आहेत काय तसेच चोरीचा माल घेतलेले अजुन काही इसम आहेत काय यांचा तपास पोलीस करीत आहेत.नमुद कार्यवाई ही श्री. डॉ. विजय मराठे यांचे मार्गदर्शणाखाली सपोनि भरत मोरे, पोहेकॉ मिरखा तडवी, पोना निलेश लोखंडे, पोकॉ. अंकुश भवर, पो.कॉ.प्रकाश कोळी, भरत कोळी, शिवदास गोपाळ,सतिश हिवाळे वांनी मिळून केलेली आहे
Users Today : 18