कार्यालय प्रतिनिधी
निगडी दि.१३ – जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे निगडी येथे येथील नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले.कै किरण सुदाम काळभोर ह्यांच्या स्मरणार्थ जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्ताने परतीच्या वारकरी बांधवांना उपवास खिचडी,चहा,नाश्ता व पाणी बॉटलची व्यवस्था निगडी येथील सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर व त्यांचे सहकारी मित्र परिवार यांच्या कडून करण्यात आली होती.
पालखीत सहभागी असलेल्या जवळपास अडीच हजार वारक-यांनी यावेळी अन्नदानाचा लाभ घेतला.
अन्नदान वाटप प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे “फ” प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी सिताराम बहुरे, निगडीतील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर,भरत पाटील,रोहिदास शिवणेकर, राजपूत संघटनेचे शहराध्यक्ष शिवकुमारसिंह बैस,रूग्णसेवक संघटनेचे शहराध्यक्ष संदीप चव्हाण,राणा अशोक इंगळे,रविंद्र कच्छवे,मल्हार बायस,रफिक शेख,शाकीर शेख,राजू शेख,हैदर भाई शेख,फयाज शेख,जावेद शेख,इंद्रजित कासारे,पप्पू दासानी,पप्पू हतागळे, समाधान मगर,महेश मगर,गौरव रौंधाळे,वाजीद मुकरताल,शाहीद मुकरताल,गणेश पुरी सह आदी मान्यवरांनी विशेष सहकार्य केले.
Users Today : 39