सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगांव तालुक्यात मोहनलाल हरणे तहसिलदार सोयगाव व दादाराव अहिरे गट विकास अधिकारी सोयगाव, मदन सिसोदिया तालुका कृषि अधिकारी सोयगाव यांच्या मार्गदर्शनाखाली बचत भवन पंचायत समिती सोयगांव येथे दि. ०९.०८.२०२३ रोजी तालुक्यातील ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामस्तरीय समिती यांचे पिक कापणी प्रयोग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदारच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मोहनलाल हरणे तहसिलदार सोयगांव यांनी ई – पिक पाहणी या बाबतची माहिती दिली. एस. जि वाघ मंडळ कृषि अधिकारी, सोयगांव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सांगून पिक विमा योजनेची माहिती दिली. व्ही एस चोंधे विस्तार अधिकारी सोयगाव यांनी पिक कापणी प्रयोग करतांना घ्यावयाची काळजी या विषयी माहिती दिली. आर. डी. फुसे, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय सिल्लोड यांनी पिक कापणी प्रयोगाबाबतचे मार्गदर्शन केले. एच. बी. देशमुख कृषि पर्यवेक्षक, सोयगांव यांनी तालुक्यात सन २०२३-२०२४ मध्ये वाटप करून देण्यात आलेल्या विविध पिकांच्या पिक कापणी प्रयोगांची माहिती दिली. अमोल रावळकर विमा प्रतिनिधी सोयगांव यांनी ऑनलाइन पिक विमा कसा भरावा व कुठल्या पिकाला किती हप्ता व विमा संरक्षित रक्कम किती आहे याबाबत माहिती दिली. आजच्या कार्यक्रमास जे.के.सुरे व व्ही.टी.जाधव नायब तहसीलदार सोयगाव, ए. जी. पैठणे पंचायत समिती सोयगाव, सर्व कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्तरीय समिती सदस्य यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ए एस बावस्कर कृषि सहाय्यक, धनवट यांनी केले व के व्ही कुमावत कृषि सहाय्यक वरठाण यांनी आभार प्रदर्शन केले.
Users Today : 0