आरोग्य संवर्धनासाठी रानभज्या उपयुक्त रानभाजी महोत्सवामार्फत प्रचार व प्रसार

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव;आजकालच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात अयोग्य व अवेळी खानपान तसेच वाढलेली रोगराई यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्यांचा समावेश आहारात केल्यास बऱ्याच प्रकारच्या रोगांना अटकाव येतो व रोगप्रतिकार शक्ति वाढते. अशी माहिती मोहनलाल हरणे तहसीलदार सोयगाव यांनी दिली व कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

तालुका कृषि अधिकारी मदन सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली बचत भवन सभागृह पंचायत समिती सोयगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी मोहनलाल हरणे तहसीलदार सोयगाव, संपत वाघ मंडळ कृषि अधिकारी बनोटी, जे.के.सुरे व व्ही.टी.जाधव नायब तहसीलदार सोयगाव, अमोल महाजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सोयगाव, हेमंत देशमुख कृषि पर्यवेक्षक सोयगाव, ए. जी. पैठणे पंचायत समिती सोयगाव, सर्व कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक आणि तालुक्यातील रानभाजी उत्पादित करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविकात संपत वाघ मंडळ कृषि अधिकारी बनोटी यांनी सांगितले कि आदिवासी दिनाचे औचित्य साधून राज्यात दि.०९-०८-२०२३ ते दि.१५-०८-२०२३ या कालावधीत सदरील कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार आज रोजी दिनांक – ०९-०८-२०२३ सोयगाव येथे सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरील कार्यक्रमात रानभाज्यांचे औषधी गुणधर्म तसेच शरीराला मिळणाऱ्या पौष्टिक घटकांची माहिती शेतकरी वर्गाला तसेच महोत्सवाला भेट देणाऱ्या नागरिकांना देण्यात आली. तसेच अमोल महाजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सोयगाव यांनी कार्यक्रमास आलेल्या शेतकरी वर्गास रानभाजी लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ए एस बावस्कर कृषि सहाय्यक, धनवट यांनी केले व के व्ही कुमावत कृषि सहाय्यक वरठाण यांनी आभार प्रदर्शन केले.

 

0 9 4 7 1 1
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *