सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात व तालुक्यात यंदा दमदार पाऊस झालाच नाही. आतापर्यंत झालेल्या भिजपावसावर ग्रामीण भागातील सावळदबारा, जामठी, फर्दापुर, सोयगाव,मोलखेडा, घाणेगांव तांडा, पिंपळवाडी, जामठी, रवळा, जवळा, डाभा, टिटवी, नादांतांडा, सह पिके बहरली आहे. मात्र, पाझर तलाव, नदी नाले अद्यापही कोरडेच असल्याने सोयगाव तालुक्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने यंदा तरी चांगला पाऊस होईल अशी आशा शेतकन्यांना होती. पुन्हा पावसाने चकवा दिल्याने शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग जमा झाले आहेत. सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसाने परिसरातील शेतशिवार हिरवेगार झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तणनाशक फवारण्या, कोळपणी, किटकनाशके करून आंतरमशागतीची कामे केली. पिकांची सद्याची स्थिती समाधानकारक झाली आहे. रिमझिम पावसामुळे पिकांवर रोगांचे प्रमाण वाढले आहेत. शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणी करून पिकांवरील रोग काही प्रमाणात आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे सावळदबारा ग्रामीण भागात पावसाने चकवा दिल्याने पाझर तलाव व नदी नाल्यांना अद्यापही पाणी वाहिले नाही. पावसळा लागुन २ महिना झाले असून फक्त दोन महिन्याच्या कालावधी राहिलेले आहेत. नदी, नाले पावसाअभावी तहानलेले आहे. पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी धोका पत्करत लागवड सुरू केली आहे. ग्रामीण भागातील नदी, नाले साधारण जूनमहिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाहू लागतात. सर्वदूर पावसाच्या सरी बरसतात. कभी मुसळधार तर कधी मध्यमस्वरूपाच्या कोसळणाऱ्या पावसाचा यावर्षी मात्र पिकांच्या अद्यापही सर्वदूर पसरण्याचा थांगपत्ता नाही. कधी या भागात तर कधी त्या भागात पाच ते सात मिनीटच पाऊस होत आहे.
Users Today : 2