प्रविण चव्हाण नंदुरबार -: भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे बालवीर चौकात भारत माता पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले.भामरे अकॅडमीचे संचालक प्रा. युवराज भामरे यांच्याा हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले.शहरातील बालवीर चौकात आयोजित कार्यक्रमा प्रसंगी सर्वप्रथम राष्ट्रीय तिरंगा ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सौ. दिपाली युवराज भामरे यांनी भारत माता प्रतिमेस पुष्प अर्पण केले.तर सामाजिक कार्यकर्ते सुरजमल तोष्णीवाल यांच्या हस्ते हुतात्मा शिरीषकुमार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंडळाचे जेष्ठ सल्लागार निवृत्त शिक्षक जी.एस. गवळी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणा संदर्भात माहिती देऊन प्रमुख अतिथींना ध्वजारोहणासाठी आमंत्रित केले.प्रमुख पाहुणे भामरे अकॅडमीचे संचालक प्रा. युवराज भामरे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत मातीला नमन… वीरांना वंदन… करण्यात आले.भारत माता की जय… वंदे मातरम… नंदनगरी के शहीद अमर रहे… अशा गगनभेदी घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.राष्ट्रभक्तीपर गीतांनी परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.कार्यक्रमाचे संयोजन शहीद शिरीष कुमार मित्र मंडळाचे सल्लागार जी. एस. गवळी, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, मोहन वाडीले, व सदस्यांनी केले.राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रमास बालवीर चौक परिसरातील शालेय विद्यार्थी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते…
Users Today : 54