कार्यालय प्रतिनिधी
निगडी : – गौरवशाली भारत मातेच्या पवित्र मातीसाठी,भारतीय स्वातंत्र्यासाठी,मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिक,हुतात्मा यांना मानवंदना देण्यासाठी,भारतभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी “माझी माती माझा देश” कार्यक्रमाचे आयोजन करून
१५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव वर्ष समारोप व मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पुर्णत्वाचा अमृत महोत्सव शुभारंभ निमित्ताने राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड पुणे आणी मराठवाडा जनविकास संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणा प्रताप उद्यान निगडी येथे स्वातंत्र्यता दिनी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण बीएसएफ माजी अधिकारी विद्यमान नार्को टेस्ट अधिकारी पुणे मेजर मोहनसिंह निंबा गिरासे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
महापुरुषांनी आपल्या आयुष्याचा होम केला अन् आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. विकासाचे नव नवे मार्ग गवसले.जगाच्या विशाल क्षेत्रात मुक्त विहार करण्यासाठी पंखांना बळ प्राप्त झाले.हे केवळ महापुरूषांच्या त्यागा मुळेच ! आपला भारत देश जुलमी ब्रिटीशांच्या राजवटीतुन व मराठवाडा निजामाच्या जुलूमातुन मुक्त करण्यासाठी लाखो देशभक्त भारतीयांनी प्राणांची आहुती दिली. स्वत:च्या संसाराची होळी केली आणि आपल्या येणाऱ्या भावी पिढयांकरीता स्वातंत्र्याची नवी पहाट आणली,अशा सर्व महान राष्ट्रपुरुष,देशभक्त,हुतात्मा,
स्वातंत्र्यसैनिक यांच्या जन्मभूमी कर्मभूमीच्या पवित्र मातीच्या मंगल कलशांचे पुजन शास्त्रोक्त पद्धतीने महाराष्ट्र शासनाने नुकतेच ज्यांना शिवछत्रपती वनश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले असे वनश्री अरूण श्रीपती पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
पवित्र माती मंगल कलशांमध्ये राष्ट्रमाता मां साहेब जिजाऊ जन्मभूमी सिंदखेडराजा पवित्र माती मंगल कलश,महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मभूमी शिवनेरी पवित्र माती मंगल कलश हिंदुसुर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जन्मभूमी कुंम्भलगढ पवित्र माती मंगल कलश,जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज कर्मभुमी बसव कल्याण पवित्र माती मंगल कलश,कैवल्यमुर्ती श्री.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळ श्रीक्षेत्र आळंदी पवित्र माती मंगल कलश,जगद् गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज जन्मभूमी कर्मभूमी श्रीक्षेत्र देहुगाव पवित्र माती मंगल कलश,सबका मालीक एक संत श्री साईबाबा जन्मभूमी पाथरी ( पार्थपुर ) पवित्र माती मंगल कलश,भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जन्मभूमी करमसद पवित्र माती मंगल कलश,मराठवाडा मुक्तीसंग्राम लढयाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ जन्मभूमी सिंदगी पवित्र माती मंगल कलश,मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ समाधीस्थळ हैदराबाद पवित्र माती मंगल कलशांसह अनेक ठिकाणच्या पवित्र माती मंगल कलशांचा समावेश होता.
भारत मातेच्या रक्षणासाठी सिमेवर लढणारा जवान आणी भारत मातेला सावली देण्यासाठी सतत झटणारा अवलिया अशा दोन जणांना म्हणजे मेजर मोहनसिंह गिरासे व वनश्री अरूण पवार यांच्या शुभहस्ते आयोजिलेल्या व खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी दखल घेतलेल्या या कार्यक्रमाची चर्चा सध्या शहरात रंगलेली दिसत आहे.
भारत देशाच्या मातीत त्याग, बलिदान,समर्पन,स्वाभिमान ,शौर्य व पराक्रमी विचारांची दैवी शक्ती आहे.जो मातृभूमीच्या मातीशी एकनिष्ठ होवून एकरूप झाला त्याने जगाच्या इतिहासात अजरामर स्थान मिळविले व जो बेईमान झाला तो त्याच मातीतून काळाच्या पडद्याआड गेला म्हणून आपल्या मातीचे वंदन करून तिचे अनन्य महत्व प्रत्येकाने जाणले पाहिजे असे विचार उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपुरूष वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे फ प्रभाग अधिकारी सिताराम बहुरे यांच्या शुभहस्ते पुजन व पुष्पहार अर्पण करून महिलांच्या हस्ते दिपप्रज्वलाने झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मराठवाडा भूमिपुत्र नितीन चिलवंत यांनी करून कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे आभार राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष ठा.शिवकुमारसिंह बैस यांनी मानले.
यावेळी पिं.चिं.मनपा.माजी कार्यकारी अभियंता सतीश इंगळे,आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी,राजपूत संघटनेच्या महिला शहराध्यक्षा अश्विनी राजपूत,माजी पुतळा समितीचे अध्यक्ष भरत पाटील,सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर,सचिन काळभोर,नामदेवराव पाटील, महानुभाव पंथाचे शहर संघटक सुरेश तळेकर,उद्योजक नेताजी सिंह,जितेन्द्र राजपूत,शैलेन्द्र राजपूत,वंडरबाॅय पृथ्वीराज इंगळे,सौ.गिरासे,सौ.दया इंगळे,सौ.रेश्मा चिलवंत,राणा मुकेश राजपूत,ॲड.डाॅ.श्रीराम परदेशी,राणा अशोक इंगळे,नारायण चंदेल,गणेशसिंह राजपूत,सागरसिंह बघेल,महेंद्र गिरासे,रूपेश राजपूत,दिनेश गिरासे,सुनिल पाटील, रविंद्र कच्छवे,लक्ष्मण चव्हाण,लक्ष्मण कुलकर्णी,अमोल लोंढे,जितेन्द्र पाटील,संतोष राजपूत, गणेश गहेरवार,ऋषी राजपूत,मल्हार बायस,सोपान राजपूत,नामदेव पवार,विनोद जाधव,परमेश्वर सोळंकी, रामेश्वर इंगळे,कु.विधी बैस,चि.शौर्य चिलवंत,कु.ईश्वरी राजपूत,चि.दिव्यांश राजपूत,चि.देवांश राजपूत सह अनेक देशप्रेमी समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Users Today : 39