छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत कुशन कामासाठी आणली होती गाडी तहशिलदार यांची माहिती सोयगाव तहसीलदार मोहनलाल हरणे यांनी कुशन काम व काही इतर कामांसाठी नेली होती संभाजीनगर येथे गाडी घटना घडली वेगळीच मुलाने घेतला गैरफायदा सोयगाव तहसीलदारांच्या बिघडलेल्या पोरानं पोलिसांची चांगलीच धावपळ उडवली. पित्याला शासनाने दिलेल्या बोलेरो गाडीत दोन मित्रांना बसवलं अन् सिडको कॅनॉट प्लेसमध्ये सायरन वाजवत बेदरकारपणे गाडी चालवू लागलं. पोलिसांनी पकडलं तेव्हा थाटात मी तहसीलदारांचा मुलगा आहे, असं सांगू लागलं तेव्हा पोलिसांनीही त्याची गुर्मी उतरवली. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही नव्हता हे विशेष. पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे. मंगळवारी दि.२२/८/२४ रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.मोहनलाल रेशमाजी हरणे हे सोयगावचे तहसीलदार असून, हर्सलमध्ये राहतात. त्यांना नुकतीच शासनाने गाडी दिली आहे. पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी २२ ऑगस्टच्या रात्री त्यांचा मुलगा गौरवकुमार मोहनलाल हरणे रा. हर्सल याने बाहेर काढली. सोबत त्याचे मित्र मानव महेश बंब वय २१, अभिजीत ताठे वय २१, दोघे रा. एम २, एन ९ हडको यांना घेतले. तिघे विनाक्रमांकाची ही गाडी सुसाट वेगाने सिडको कॅनॉट भागात घेऊन आले. विशेष म्हणजे अगदी स्वतःच तहसीलदार असल्याच्या थाटात त्याने गाडीवर अंबर दिवाही लावलेला होता अन् सायरन वाजवत भरधाव गाडी दामटत होता. डायल ११२ चे पोलीस त्याच भागात गस्तीवर होते. त्यांना या वाहनाचा संशय आला. त्यांनी या गाडीचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे गौरवने गाडी आणखी सुसाट राँड साईडच दामटली. पोलिसांनी काही अंतरावर गाडी थांबवली. तिघांची चौकशी केली तेव्हा ही गाडी सोयगावच्या तहसीलदारांची असल्याचे समोर आले. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे आणि सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी या घटनेची नोंद सिडको पोलीस ठाण्यात केली.
पासिंगविनाच गाड्या शोरूममधून बाहेर काढण्यात आल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. गाड्यांचे वाटप झाले अन् तहसीलदारांसारख्या अधिकाऱ्यांनी नियम मोडीत काढून गाड्या घरीही नेल्या अन् विशेष म्हणजे शासकीय वाहन आपल्या लाडक्या लेकाच्या हातीही सोपवले. नियमाप्रमाणे अधिकाऱ्याला कार्यक्षेत्राबाहेर त्याचे सरकारी वाहन वापरता येत नाही. नियुक्त चालकाशिवाय अन्य कोणालाही, कुटुंबातील सदस्यांनाही शासकीय वाहन वापरण्याचा अधिकार नाही. अधिकारी वाहनात नसेल तर अंबर व सायरन खाली काढून चालवणे बंधनकारक असते.
सोयगाव तहसीलदार मोहनलाल हरणे म्हणतात….. आम्हाला शासकीय वाहन मिळाले असून, पासिंग व कुशनच्या कामासाठी हर्सलला घरी गाडी आणली होती. मुलांना हे काम करून घेण्यास सांगितले होते. मात्र त्यांच्याकडून नकळत चूक झाली, असे तहसीलदार मोहनलाल हरणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Users Today : 54