नॅशनल मराठी विद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली

Khozmaster
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील नॅशनल मराठी विद्यालयात श्रीकृष्ण अवतार दिनानिमित्त गोकुळाष्टमी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.’हाथी घोडा पालखी.. जय कन्हैया लाल की…’ असा जयघोष, श्रीकृष्ण-राधा यांची विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा, दहीहंडी फोडण्यासाठी बालगोपाळांकडून लावले जाणारे थर… अशा उत्साहाच्या वातावरणात नॅशनल मराठी प्राथमिक शाळा सावळदबारा येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.कार्यक्रमात मुलांनी मनमुराद आनंद लुटला. ‘गोविंदा आला रे आला……’ या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला. शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पथकाने दोन थर लावत दहीहंडी फोडताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. याप्रसंगी मुख्याध्यापक योगेश चोपडे यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले. राधा कृष्णाची वेशभूषा करून शाळेतील विद्यार्थी दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. शाळेत बांधण्यात आलेली दहीहंडी श्रीकृष्ण रूपातील बालकांनी बासरीच्या मदतीने फोडली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक योगेश चोपडे व शाळेतील शिक्षक पिसे सर आर बी राठोड सर व्ही एम चव्हाण सर पी एम जाधव सर एल एम चव्हाण सर योगेश खैरे उपस्थित होते

0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *