छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील क्षेत्र सावळदबारा कलियुगातील परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामी येथील मंदीरावर सात दिवस चालणारे धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कृष्ण मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवारी मध्यरात्री कृष्णजन्माष्टमी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कृष्ण जन्मानंतर शेकडो उपस्थित भाविकांनी कृष्ण भगवान की जय हो, राधे-कृष्णा गोपाळ-कृष्णा जयघोष करत दर्शनाचा लाभ घेतला.फुलांनी सजविलेल्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्यात येऊन जन्म साजरा करण्यात आला. त्यानंतर फटाके फोडून मुरमुरे,पेढे वाटप करण्यात आले.श्री कृष्णजन्माष्टमीनिमित्ताने बुधवारी सायंकाळी श्री कृष्णनगर कृष्णमंदिर येथून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या पालखीत कृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली होती. मिरवणुकीत शेकडो भाविक भक्तांनी व महिलांनी वेषभूषा परिधान करून व पेठे बांधून सहभागी झाले होते. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. श्रीकृष्ण जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गोपीनाथ पुजारी, अखिल भारतीय पंचकृष्ण मंडळाचे अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत व पुजारी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.अखिल भारतीय पंचकृष्ण परिषदचे आचार्य प.पु.मं.लोणाकर बाबा महानुभाव गोपाळ आश्रम बुलढाणा, सरपंच शिवाआप्पा चोपडे उपसरपंच मो आरिफ मो लुखमान गणेश खैरे आदींसह शेकडो भाविक उपस्थित होते.गुरुवारी मंदीराचे पुजारी गोपीनाथ पुजारी यांच्या वतीने १२ ते ३ महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी शेकडो भाविकांनी लाभ घेतला, तर गुरुवारी सकाळी ९ वाजता ध्वजारोहण माजी उपसरपंच मुकुंदा मानकर , गोपीनाथ पुजारी,गोलू पुजारी अरुण पुजारी, गोकुळसिंग राजपूत, प्रवीण राजपूत उपस्थित होते
रात्री कथा प्रवक्ता कृष्णकृपा प्रेम मूर्ती दिलीप जी महाराज वृंदावन धाम जळगावकर यांचे संगीतमय मधूर वाणीतून जाहीर किर्तन झाले.हरिप्रिया कृष्णलीला धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.मिरवणूकीत कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी फर्दापूरचे सपोनि भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावळदबारा बिट जमादार मिरखाॉ तडवी, प्रकाश कोळी, भरत कोळी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Users Today : 54