छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
अमळनेर दि : ५ सप्टेंबर बुधवार रोजी करियर समुपदेशन सेंटर व स्पर्धा परीक्षा समिती , प्रताप महाविद्यालय अमळनेर आयोजित पूज्य सानेगुरुजी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा दि ५ व ६ सप्टेंबर २०२३ ला आयोजित करण्यात आलेला होता . या दोन दिवसीय निवासी स्पर्धेचा निकाल ६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रभरातून २५ संघ उपस्थित होते .
या राज्यस्तरीय आंतर महाविदयालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्रदिप गोकुळ पाटील , व हर्षनंदन शांताराम चौधरी यांनी एकूण १२० गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकवला.
यावेळी सन्मानीय मान्यवर प्रमुख अतिथी मा. श्री. सुनील नांदूरकर साहेब(पोलीस उपअधीक्षक अमळनेर), मा. डॉ. अनिल शिंदे ( कार्य अध्यक्ष प्रताप महाविद्यालय ) मा. श्री.दिलीप गांधी , प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य .ए.बी.जैन साहेब तसेच प्रा..डॉ.विजय तुंटे सर यांच्या हस्ते ट्रॉफी सन्मानपत्र व रोख ५००० रुपये देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे मा. प्राचार्य श्री. प्रा.डॉ. पी.एस. पाटील सर तसेच मा. प्रा. डॉ. अनिता खेडकर (विद्यार्थी विकास अधिकारी)आणि मा. प्रा. डॉ.भरत खंडागळे सर तसेच सर्व प्राध्यापकांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
Users Today : 54