सोयगाव तालुक्यात रुसलेला वरुणराजा बरसला बळीराजा आनंदाला

Khozmaster
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.रुसलेला वरुणराजा तब्बल एक महिन्याच्या विश्रांती नंतर मंगळवारी सायंकाळी व बुधवारी पहाटे बरसला त्यानंतर दिवसभर विश्रांती घेऊन संध्याकाळी पाच वाजता पावसाचे पुन्हा आगमन झाले.पावसामुळे महिनाभरापासून कोरड्या ठाक पडलेल्या नदीपात्रात पुन्हा एकदा पाणी खळाले. दरवर्षी पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या सावळदबारा व परिसरात डाभा मोलखेडा हिवरी देव्हारी घाणेगांव तांडा पिंपळवाडी चारुतांडा घाणेगाव तांडा परिसरात काहीअंशी दिलासा मिळाला. मागील तीन महिन्यांत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा व फर्दापूर परिसरात एकही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यातच अधूनमधून तुरळक स्वरूपात पडणाऱ्या पावसानेही महिनाभरापासून दडी मारल्याने परिसरातील पिके शेवटच्या घटका मोजत होते. नदीपात्रासह जवळपास सगळेच पाइर व सिंचन तलाव कोरडे पडल्याने परिसरातील मत्स व्यवसायही यंदा जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र आहे. दरम्यान,

महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाचे गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास सावळदबारा परिसरात दमदार आगमन झाले. हा पाऊस अधूनमधून विश्रांती घेत सकाळी साडेसात वाजेपर्यंत परिसरात रुसलेला वरुणराजा कोसळत राहिला बळीराजा आनंदीत झाला आहे.

 

0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *