छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पाचोरा तालुक्यातील बाळद ब्रुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका श्रीमती विजया पाटील यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार”जिल्हास्तरीय हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा बाळद बुद्रुक येथील श्रीमती विजया भालचंद्र पाटील यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय गुलाबराव पाटील तसेच माननीय आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास जळगावचे जिल्हाधिकारी माननीय आयुष प्रसाद तसेच जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अंकित साहेब व शिक्षणाधिकारी माननीय विकास पाटील साहेब देखील उपस्थित होते . विजया पाटील या उपक्रमशील शिक्षिका असून त्यांनी स्वतःचा *सावित्रीच्या लेकी* हा शैक्षणिक ब्लॉग तयार केला आहे .त्याचप्रमाणे स्वतःचे यूट्यूब चैनल सुरू केलेला असून शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध व्हिडिओ त्यांनी चॅनलला अपलोड केलेले आहेत . व्ही स्कूल ऍप साठी त्यांनी सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केलेली आहे .त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात वारंवार करत असून स्वतः तंत्रस्नेही शिक्षिका आहेत. स्पर्धात्मक परीक्षेत त्यांच्या शाळेचे शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यांनी लोकसहभागातून शाळा डिजिटल केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत जळगाव जिल्हा परिषदेने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारने त्यांच्यावर तालुक्यातून, नातेवाईक, शिक्षकवृंद व मान्यवर यांच्या कडून शुभेच्छा वर्षाव होत आहे.
Users Today : 54