कान्हाळा ते खेडी रस्त्यावर तरुणाने केले तरुणीवर कटरने वार पोलिसात गुन्हा दाखल

Khozmaster
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

भुसावळ तालुक्यातील कान्हाळा ते खेडी रोडवरील एका शेताजवळ तरुणीला लग्न करण्यासाठी दबाव टाकत कटरने वार करून हातावर व छातीवर वार करून केल्याची घटना शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ८ वाजता एकावर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भुसावळ शहरातील हनुमान नगरात २१ वर्षीय तरुणीही आपल्या परिवारासह राहायला आहे. शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता तरुणी ही हंसराज चव्हाण उर्फ पिंटू (रा. दीनदयाल नगर भुसावळ) याच्या रिक्षात बसून कन्हाळा ते खेडीरोड दरम्यान असलेल्या एका शेताजवळ जात असताना अचानक हंसराज चव्हाण यांनी रिक्षा थांबवली व तरुणीला खाली उतरवून ‘ तू माझ्याशी लग्न कर’ असं म्हणाला. त्यावर तरुणीने नकार देत “तू नेहमी मारहाण व शिवीगाळ करत असल्याने मला तुझ्याशी लग्न करायचे नाही” असे बोलले. याचा राग घेऊन त्याने खिशातील कटर काढून तरुणीच्या हाताव आणि छातीवर वार करून गंभीर जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी हंसराज चव्हाण उर्फ पिंटू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप बडगे करीत आहे.

 

0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *