फर्दापुर पोलीसांनी 48 तासात ट्रकचे टायर व डिक्स चोरणा-या 03 चोरटयांना केले जेरबंद

Khozmaster
3 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सपोनि भरत मोरे यांची धडाकेबाज कारवाई

सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे फर्दापूर हद्दीत त्यांचे कडुन चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…. मा. पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील चोरी करणा-याचा चोरट्यांचा शोध घेवून त्यांना

जेरबंद करण्याबाबत सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या आहेत.यावरुन सिल्लोड उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कुमार कोल्हे साहेब यांनी अशा गुन्हयांचा जलद गतीने तपास करण्याबाबत मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकिस आणुन अशा घटनांना आळा बसणे कामी मार्गदर्शन केले. फर्दापुर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 134/2023 भादवि कलम 379 प्रमाणे फिर्यादी नामे करंजीतसिंग चंचलसिंग भटटल वय 47 वर्षे व्यवसाय न्यु के. एस. ट्रान्सपोर्ट राजबिंदा इस्टेट शहानुरवाडी जि. औरंगाबाद यांनी दिनांक 05/09/2023 रोजी त्यांचे मालकीचे ब्रिस्टॉन कंपणीचे ट्रकचे दोन टायर व डिक्स असे एकुन 72000/- रुपये चा मुददेमाल अज्ञात आरोपीतांनी चोरी केल्याबाबत फिर्याद दिलेली होती त्यानंतर फर्दापुर पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे हे त्यांचे तपास पथकासह फर्दापूर शिवारातील धनवट फाटयावर व गांवामध्ये तसेच राजकुवर महाविदयाल च्या समोर ज्याठिकाणी चोरी झालेली होती त्याठिकाणी पोहोचले त्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे तात्काळ फिरवुन ट्रक क्र.एम.एच.26 एडी 3144 वरील ड्रायव्हर नामे अर्जुन पिता गौरीशंकर प्रसाद वय 35 वर्षे रा. थमणपुरा तालुका बासडी जि. बलिया राज्य उत्तरप्रदेश व क्लिनर नामे सुशिल पिता शिवविलास प्रसाद वय 23 वर्षे रा. हल्दी पोस्ट अलमपुर जिल्हा बलिया राज्य उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनीच सदर ची चोरी केली आहे असे चौकशी मध्ये निष्पन्न झाल्यानंतर सदरचा मुददेमाल कोठे आहे यासाठी आम्ही सदर आरोपीतांला विचारले असता फर्दापुर गांवामधील टायरचे पंक्चर काढणारा इसम नाम मोहम्मद अजमल शेख वय 22 वर्षे रा. ह. मु. फर्दापुर मुळ रा. मुपो मगदुमपुर कुदरिया जि.मज्जफरपुर राज्य बिहार यांने घेतलेले आहे असे समजल्यानंतर त्यास पण सदर च्या गुन्हयामध्ये अटक करुन 03 दिवसांचा पिसीआर घेतलेला असुन पोलीस कस्टडी रिमांडमध्ये त्यांचे कडुन 52000/- रुपये किंमतीचे ब्रिसटॉन कंपणीचे दोन टायर व 20000/- रुपये किंमतीचे दोन लोखंडी डिक्स असा एकुन 72000/- रुपये किंमतीचा मुददेमाल 100 टक्के रिकवर केलेला आहे. सदर ची कार्यवाही पोलीसांनी 48 तासांच्या आत करण्यात आली आहे सपोनि भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोना निलेश लोखंडे, पोकॉ. योगेश कोळी, पो.कॉ.प्रकाश कोळी, भरत कोळी, सतिश हिवाळे, प्रदिप बेदरकर, जगदिश सोनवणे, आनंद पगारे यांनी मिळुन केलेली आहे….

0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *