प्रतिनिधी संजय जटाळे जामनेर तलाठी मॅडम हकलतात उंटावरून शेळ्या; प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली
जामनेर – तालुक्यातील शेंदुर्णी जवळ असलेल्या लिहे तांडा येथील तलाठी मॅडम हकलतात उंटावरून शेळ्या एकीकडे हलक्याऐवजी शहरात थाटलेल्या कार्यालयातही तलाठी हजर राहत नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.विशेष म्हणजे तलाठी केव्हा येणार याची माहितीही नागरिकांना मिळत नसल्याने खेड्या-पाड्यातील नागरिकांच्या सोयीसाठी हलक्याच्या ठिकाणी राहणे सोडून अनेक तलाठी काही घरुन तर काही कार्यालयातूनच तलाठी त्यांचा कारभार सांभाळतात.आणि गावात झिरो तलाठी ठेवलेला असतो. त्यामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना त्यांच्या कामासाठी ३०-३० किलोमीटरपर्यंत प्रवास करून जामनेर शहरात यावे लागते.जामनेर शहरातील कार्यालयात आल्यानंतरही तलाठ्याची भेट होईल, याची काहीही शक्यता नाही. कोणी कुठे तर कोणी कुठे असा सर्व प्रकार पाहावयास मिळत आहे. गुरूवारी बाजारच्या दिवशी हा प्रकार पाहावयास मिळाला. तलाठी कार्यालयात कामानिमित्त अनेक नागरिक आले होते. परंतु तलाठी हजर नसल्याने प्रतीक्षा करण्या पलीकडे त्यांच्याकडे काहीही इलाज नव्हता. तलाठी कार्यालय, जामनेर असे लिहिलेल्या कार्यालयात तलाठीच हजर नव्हते. याबाबत माहिती द्यायलाही कोणी तयार नव्हते.
अशीच वागणूक येथे कामानिमत्त येणाऱ्या नागरिकांना मिळत असते. त्यामुळे परिसरातील शेतकरी प्रचंड त्रस्त झाले असल्याचे दिसून येत आहे.
शेवटी तलाठी सजा यांना मुख्यालयी हजर राहण्याचा शासनाचा आदेश असताना शुद्धा केराची टोपली दाखवली जात आहे. तहसीलदारांनी तलाठ्यांच्या अशा बेजबाबदार व हलगर्जीपणाकडे लक्ष द्यावे व तलाठ्यांना कार्यालयात थांबण्याबाबत आदेश द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Users Today : 54