नगर परिषद तर्फे स्वनिधींसे समृद्धी कॅम्पचे आयोजन

Khozmaster
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,०८

नगर परिषद वैजापूर च्या वतीने “पीएम स्वनिधी”व स्वनिधींसे समृद्धी अंतर्गत कॅम्प आयोजित करून याद्वारे शहरातील होतकरू १८८लाभार्थ्यांना शुक्रवार (ता,०८)रोजी बँकांनी दहा हजार रुपये द्यावे म्हणून लाभार्थी यांना मंजुरी पत्र प्रदान करण्यात आली,प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत(राजपूत)यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात शहरातील सर्व बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते,तसेच पंतप्रधान सुरक्षा बिमा योजना, व जीवन ज्योती बिमा योजना चा ही लाभ या लाभार्थ्यांना देण्यात आला,या प्रसंगी उप मुख्याधिकारी राहुल साठे यांनी सर्व उपस्थित बँक व्यवस्थापक व त्यांचे प्रतिनिधी यांचे स्वागत केले, या साठी माजी शिक्षणाधिकारी तथा ,पालिका स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले आहे,या प्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी सुनील भाग्यवंत,समुदाय संघटक दिवाकर त्रिभुवन ,श्रीमती काकडे,व अमीन पठाण यांनी सहभाग नोंदविला.

 

0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *